Pune News : भरदुपारी मुळा नदीपात्रात महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune News : पुण्यातील दापोडी येथील मुळा नदीच्या पात्रात आज १७ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

महिलेची ओळख पटविण्याचं काम सुरू...

नदीपात्रात मृतदेह असल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जलपरी या विशेष वाहनासह जवानांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला आहे. संबंधित महिलेने नदीपात्रात कधी आणि कोणत्या कारणाने उडी मारली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, महिलेची ओळख पटविण्याचे सुरू आहे. पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article