Pune News : गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं; एक तरुण गंभीर जखमी

या गोळीबारात हरीश जाधव जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगर येथे धक्कादायक गोळीबाराची  घटना समोर आली आहे. गुरुकृपा सोसायटीच्या पाठीमागे ही गोळीबाराची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महाकाल टोळीने हा गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारात हरीश जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सक्षम गायकवाड, ओम गायकवाड, सोनू मुंडे आणि सुमित वर्णवाले या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यात हळदीतून नशा! उच्चभ्रू परिसरातील धक्कादायक प्रकार उघड, दोघांना अटक

प्राथमिक तपासात हा गोळीबार वर्चस्वाच्या वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंडवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

Topics mentioned in this article