रेवती हिंगवे, पुणे: पुण्यामध्ये मैत्रिणीला गुंगीचे औषध देत 5 लाखांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील विवा सोसायटीत घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यात कोल्ड कॉफीमधून मैत्रिणीला गुंगीच औषध देऊन पाच लाखांचे दागिने कंपास केल्याचा प्रकार समोर आलाय. मैत्रिणींनाच केलेल्या प्रकारामुळे पुण्यात हा विषय चर्चेचा ठरलाय. दोघेही मैत्री स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यातील सदाशिव पेठेत रूममेट होत्या. काही कालावधीनंतर दोघींचीही लग्न झाली. लग्नानंतर आता दोघीही आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव पठार परिसरात राहतात. ज्या मैत्रिणीने पाच लाखांचे दागिने चोरले त्या मैत्रिणीला ऑनलाईन गेमिंगचा नाद असल्याचाही समोर आले.
6 मार्चला दुपारी चार वाजता आपल्या मैत्रिणीसाठी कॉल कॉफी घेऊन तिच्या घरी गेली त्यात गुंगीचा औषध मिसळले. ते प्यायल्यानंतर दुसरी मैत्रीण बेशुद्ध पडली त्यानंतर कपाटात ठेवलेले पाच लाख 46 हजार रुपयांचे दागिने मैत्रिणींने लंपास केले. दरम्यान, काही दिवसांनी घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली.
(नक्की वाचा : Pune News: 'एक कोटींची जमीन 1 रुपये भाडे...', तरीही मंगेशकर हॉस्पिटलची पैशासाठी मग्रुरी का? )
दरम्यान, याप्रकरणी एका तरुणीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. जिवलग मैत्रिणीनेच अशाप्रकारे विश्वासघात केल्याने या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.