Pune News: मीटिंग सुरु होती, तितक्यात मराठी IT इंजिनिअर बाहेर पडला... सातव्या मजल्यावरुन मारली उडी!

Pune News: पीयूष गेल्या एक वर्षापासून त्या कंपनीत काम करत होता, सकाळी दहाच्या सुमारास मीटिंग सुरू असताना छातीत दुखत आहे, असं म्हणून तो बाहेर पडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ताण-तणाव हा सातत्यानं चर्चेचा आणि काळजीचा विषय बनला आहे. या क्षेत्रातील तीव्र स्पर्धा, कामाचं टार्गेट, नोकरीतील राजकारण यामुळे अनेकांनी यापूर्वी टोकाचा निर्णय घेतलाय. काही जणांनी हे फिल्ड सोडले. पुण्यातील हिंजवडी भागात आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. या कंपन्यांमुळे या भागाचा चेहरामोहराच बदलला. नवीन शहरच इथं एकप्रकारे वसलं आहे. पण, त्याचबरोबर आयटी क्षेत्रातील समस्यांचं या भागाला ग्रहण लागलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

आयटी इंजिनिअरनं दिला जीव

आयटी हब हिंजवडीमध्ये 'ॲटलस कॉपको' नावाच्या कंपनीत काम करणाऱ्या आयटी अभियंत्याने सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी ( 28 जुलै) सकाळी दहाच्या सुमारास घटना घडली, पीयूष अशोक कवडे अस आत्महत्या केलेल्या आयटी अभियत्याचं नाव आहे.

(नक्की वाचा : Pune Couple Video : धावत्या बाईकवर पुण्यातील जोडप्याचा रोमान्स, दुचाकीवरच्या टाकीवरील महिलेनं जे केलं.... पाहा Video )

पीयूष गेल्या एक वर्षापासून त्या कंपनीत काम करत होता, सकाळी दहाच्या सुमारास मीटिंग सुरू असताना छातीत दुखत आहे, असं म्हणून तो बाहेर पडला. त्यानंतर त्यानं लगेच सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

"मी आयुष्यात अपयशी ठरलो आहे, मला माफ करा," असं सुसाईड नोटमध्ये लिहिलेल आहे. पीयूष हा मूळ नाशिकचा असून सध्या तो वाकड येथे राहत होता. त्याच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Advertisement
Topics mentioned in this article