
योगेश पाटील, प्रतिनिधी
Pune Couple Video : पुणे परिसरात रस्त्यावरून जात असलेल्या एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दुचाकीवरून प्रवास करत असताना या जोडप्याने रोमान्सच्या नावाखाली जीव धोक्यात घालून अश्लील चाळेच सुरू केले.
महिला दुचाकीच्या टाकीवर बसलेली आहे आणि पुरूष दुचाकी चालवतोय. भरधाव दुचाकीवरच महिलेचा थिल्लरपणा सुरू होतो. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आलाय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील प्रकार पुण्यातील शिंदेवाडी भागात घडला आहे.
खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावर जोडप्याचे भररस्त्यावर हे चाळे सुरू होते.पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकीस्वाराचे जा जोडप्याकडे लक्ष गेले. त्याने त्यांचा व्हिडीओ शूट केला. बरेच अंतर पुढे जाईपर्यंत या जोडप्याचे दुचाकीवर अश्लील चाळे सुरूच होते.
( नक्की वाचा : Population crisis : घटत्या लोकसंख्येवर अजब उपाय! 'या' देशात विद्यार्थिनींना गर्भवती झाल्यावर मिळणार 1 लाख रुपये )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world