- भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात पीडित तरुणीने आपला जबाब बदलला आहे
- पीडित तरुणीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे
- आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत
देवा राखुंडे
Bhigwan kidnapping case: इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाने राज्याचं वातावरण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणात वेळोवेळी ट्वीस्ट आला आहे. आधी पिडीत तरुणी प्रियकरासोबत गेली. त्यानंतर आपण त्याच्यासोबत मर्जीने गेल्याचं ही तिने सांगितलं. आईकडे जाण्यास ही नकार दिला. सुधागृहात गेल्यानंतर तिने परत आपला जबाब बदलला. त्यामुळे या प्रकरणाला वेळोवेळी वेगवेगळे वळण मिळाले आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. पिडीत तरुणीने पुन्हा एकजा आपला जबाब बदलला आहे. त्यात तिने आरोपी प्रियकर तरूणा विरोधात गंभिर आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
पीडितेने आता पोलिसांसमोर आपला जबाब फिरवला आहे. ज्यामुळे आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नव वळण लागल आहे. पीडितेने मागील दोन दिवसापूर्वी पोलिसांसमोर हा जबाब दिला आहे. अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे. पीडितेने आपल्यावर अत्याचार झालाय असा जबाब पोलिसांना दिलेला आहे. पीडितेने जे आरोप लावलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस तपास करत पुरावा गोळा करीत आहेत. ज्यावेळी ती अल्पवयीन होती त्यावेळी आरोपीने आपल्या सोबत शरिरसंबंध ठेवले होते असं पीडित तरुणीने आपल्या जबाबात म्हटले आहे.
तीन जबाबात सांगितले की आरोपीने आपल्यावर बळजबरीने शरीर संबंध ठेवले. जो जबाब तिने दिला आहे त्या जबाबात तिघा आरोपींची नावे दिली आहेत. यामध्ये एक पूर्वीचाच आरोप असून त्याच्यावरच पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची वाढ होणार आहे. जी दोन नवीन आरोपींची नावे दिली आहेत, त्यांचा यामध्ये काय रोल आहे याचा तपास देखील आता पोलीस करणार आहेत. पाच दहा वर्षा पूर्वी ही तरुणी अल्पवयीन होती. त्यावेळी अत्याचार झाल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या जबाबा वरून आरोपीला अटक करता येत नाही, जे आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने पुराव्याची पडताळणी होईल. वेळोवेळी वेगवेगळे स्टेटमेंट समोर आली आहेत. न्यायालयासमोर केलेलं स्टेटमेंट आणि आता पोलिसांसमोर दिलेले स्टेटमेंट वेगळं आहे. स्टेटमेंटमध्ये विभिन्नता आहे. त्यामुळे तांत्रिक पुरावे किंवा इतर पुरावे असतील ते समोर येतील त्या अनुषंगाने आपण आरोपीवर कारवाई करणार आहोत असं पोलीसांनी स्पष्ट केलं आहे.
पीडित तरुणी वारंवार आपले जबाब बदलत आहेत. त्यामुळे भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात ट्वीस्ट निर्माण झाला आहे. पीडितेने यावेळी ही जबाब फिरवला आहे. आरोपीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. हा तिचा नवा आरोप आहे. शिवाय तो गंभिर आहे. दोन दिवसांपूर्वी पीडितेने पोलिसांसमोर असा जबाब दिल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. पीडितेने सतत जबाब फिरवल्याने सखोल चौकशी होणार असल्याचं पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी स्पष्ट केलं आहे. वारंवार जबाब बदलत असल्याने तरुणीच्याही अडचणी पुढे वाढण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world