Pune News: पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, रेड लाईट एरियातील 'त्या' 5 महिलांना अटक

पुण्यातील बुधवार पेठच्या रेड लाईट परिसरातील फरासखाना पोलिसांनी बांगलादेशी महिलांवर मोठी कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Crime News Today

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी 

Pune Crime News : पुण्यातील बुधवार पेठच्या रेड लाईट परिसरातील फरासखाना पोलिसांनी बांगलादेशी महिलांवर मोठी कारवाई केली आहे. भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या 11 महिन्यांत पुणे पोलिसांनी पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या आता 94 वर पोहोचली आहे.

बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम

मिळालेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत फरासखाना पोलीस स्टेशनने बुधवार पेठ परिसरात रात्री 1 ते सकाळी 9 वाजेपर्यंत कोंबींग ऑपरेशन केलं. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, माचिस बिल्डिंग परिसरात काही बांगलादेशी महिला अवैधरित्या राहत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 5 महिलांना ताब्यात घेतले.

Advertisement

नक्की वाचा >> Ratnagiri News : मुंबईच्या तरुणाची मे महिन्याची सुट्टी ठरली शेवटची, कोकणात गावी गेला अन् भयंकर घडलं

वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करायच्या आणि..

या प्रकरणाच्या तपासा दरम्यान, या महिला बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात आल्याचे समोर आले. त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती पोलीास तपासात उघड झाली. तसेच त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावेही आढळून आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 नक्की वाचा >> Mumbai News: मराठीला डावलणाऱ्यांना मुंबईत जागा नाही! 'या' नगरसेवकाने प्रशासनाची उडवली झोप, प्रकरण काय?