Pune News : पुण्यात हळदीतून नशा! उच्चभ्रू परिसरातील धक्कादायक प्रकार उघड, दोघांना अटक

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील एका उच्चभ्रू परिसरात घडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील एका उच्चभ्रू परिसरात घडला आहे. पुणे पोलिसांनी एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. येथे हळदीच्या पाकिटातून 'नशा' विकला जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं. 

पुण्यातील उच्चभ्रू बाणेर भागात पोलिसांनी एक ड्रग रॅकेटचा भांडाफोड केला आहे. येथे हळदीच्या पाकिटाच्या आड गांजा विकला जात होता. या प्रकरणात बाणे पोलिसांनी दोन आरोपी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे या दोघांना अटक केली आहे. यांच्याकडून १६ किलो गांजा ताब्यात घेण्यात आला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील AI विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफासापूर्वी मोबाइलसोबत केलेल्या कृत्याने पोलीसही हैराण!

पोलिसांनी १६ किलो गांजा घेतला ताब्यात...

या पाकिटांच्या तपासानंतर पोलिसही हैराण झाले. कारण या पाकिटावर हळद लिहिलं होतं, मात्र प्रत्यक्षात त्या पाकिटांमध्ये गांजा होता. सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळावरील तब्बल तीन किलो गांजा जप्त केला. चौकशीदरम्यान आरोपींनी पिंपरी-चिंचवड स्थित आपल्या घरात अमली पदार्थ जमा केल्याचं मान्य केलं आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापेमारी करीत १३ किलो गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. 

आरोपी एका खासगी कंपनीतील कर्मचारी...

अटक केलेले दोन्ही आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करतात, अशा माहिती समोर आली आहे. तपासानुसार, हळदीच्या पाकिटाचा वापर करीत गांज्याची विक्री करीत होते. या प्रकरणात बाणेर पोलीस पुढील तपास करीत आहेत. एबीपी न्यूजने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Topics mentioned in this article