राहुल कुलकर्णी, पुणे: पुणे पोलिसांनी खराडी परिसरातील एका बोगस कॉल सेंटरवर छापा मारून तब्बल 123 जणांना ताब्यात घेऊन आठ जणांवर गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली होती. अमेरिकेतील नागरिकांना अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्याची जबरदस्ती करत, डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. सुमारे 100 कोटींपेक्षा अधिक रकमेची यात फसवणूक झाल्याचा पोलिसांना अंदाज होता, परंतु या प्रकरणात 5 आरोपींना 6 दिवसांची पोलिस कोठडी मिळूनही फसवणूक झालेला एकही अमेरिकन नागरिक तक्रारदार समोर आणता आला नाही, त्यामुळे सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकन परकीय विभागास पत्रव्यवहार, ई-मेल पाठवण्यात आला नाही. यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढत न्यायालयाकडून खरडपट्टी काढण्यात आली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. आरोपींच्या वकिलांनी लगेच सदर आरोपींचे जामिनासाठी अर्ज दाखल केले.
या प्रकरणात पोलिसांनी एक तरी तक्रारदार दाखवणे गरजेचे आहे. नेमका अमेरिकन एजन्सीसोबत त्यांनी कोणता पत्रव्यवहार केला हे दाखवून द्यावे. डिजिटल अरेस्ट कशाप्रकारे केली गेली व पैसे घेतले गेले हे स्पष्ट करावे. नेमका मालमत्तेचा मालक कोण हे स्पष्ट करावे. पोलिसांना आणखी १०० आरोपी मिळतील, परंतु फिर्याद कोणा एकाची तरी आवश्यक आहे.
( नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video )
आरोपींना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा सूत्रधार करणसिंग शेखावत (३२, रा. अहमदाबाद) संजय मोरे (जयपूर), केतन रवानी (गुजरात) हे अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तसेच तपास गुंतागुंतीचा व गुन्ह्याची पध्दत क्लिष्ट असल्याने तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडी ७ दिवसांनी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी केली होती.
Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर