अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Women Murder Love Affair: कथित प्रेमसंबंधांच्या संशयावरून एका 39 वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात उघडकीस आली आहे. ही हत्या इतकी निर्घृणपणे करण्यात आली की मृत महिलेची दोन्ही हाताची हाडे मोडली होती, तिला बॅट तुटेपर्यंत मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी चंदननगर पोलिसांसह गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांत वकील, त्याची पत्नी आणि मुलगी या तिघा आरोपींना अटक केली आहे. पूनम दिनेश मून (वय ३९, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
Kalyan News: कल्याणमध्ये 3 हजार लिटर गावठी दारू जप्त, 2 आरोपींना अटक, कुठे आणि कसा रचला सापळा?
प्रेमसंबंधातून विवाहितेची हत्या, मायलेकीने निर्घृणपणे संपवलं
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला पूनम दिनेश मून ही ॲड. संजय दत्तात्रेय सावंत यांच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम पाहत होत्या. संजय सावंत यांची पत्नी स्वाती सावंत यांना पूनम मून हिचे आपल्या पतीसोबत संबंध आहेत असा संशय होता. याच संशयातून स्वाती सावंत यांनी मुलीसह मिळून पूनम यांच्या हत्येचा कट रचला. चंदननगर येथील कार्यालयात आरोपींनी पूनम यांचे पाय दोरीने बांधून बॅटने आणि धारदार शस्त्राने वार करून खून केला.
या कटामध्ये वकील संजय सावंत याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संजय सावंत आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेतले. तर, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने स्वाती सावंत हिला ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक नीलेश बडाख आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भयंकर अवस्थेत मृतदेह सापडला
दरम्यान, मृत पूनम मून यांचे पती दिनेेश मून यांनी ही हत्या पत्नी आणि स्वाती सावंत यांच्यामधील वादामधून झाल्याचा दावा केला आहे. चंदननगर येथील कार्यालयात पूनम यांचा मृतदेह भयंकर अवस्थेत सापडला. तिचे दोन्ही हाताची हाडे तुटली होती. तोंडावर असंख्य वार करुन चेहरा विद्रुप करण्यात आला होता. मृतदेहाशेजारी तुटलेली बॅट, करवत आढळल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुढील तपास लोणीकंद विभागाच्या सहाय्यक आयुक्त नूतन पवार करत आहेत. नातेवाईक आक्रमक होत चंदननगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले आहेत.
नक्की वाचा >> Kalyan News: "सत्ता पैसा गुंडगिरी...", कल्याणमध्ये वरुण सरदेसाईंचा शिंदे गटाला इशारा, "मधूर म्हात्रे बेईमान.."