2 कोटींच्या कारने घेतला दोघांचा जीव, पुण्यातील बड्या बापाच्या लेकाच्या 5 संतापजनक गोष्टी 

पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कारवर VIP नंबर प्लेट लावण्यात आली होती. तसेच याकरिता कार मालकाने 45 हजार रुपये खर्च केल्याचंही म्हटले जात होते.   

Advertisement
Read Time: 3 mins
अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना केली अटक

Pune Hit And Run: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. पण या प्रकरणातील कित्येक धक्कादायक गोष्टी उजेडात येत आहेत. पोलिसांनी मंगळवारी (21 मे 2024) अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांनाही अटक केली आहे. तर अल्पवयीन आरोपीला काही अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या धक्कादायक गोष्टींमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.  

दारूसाठी खर्च केले 48 हजार रूपये, रजिस्ट्रेशनसाठी 1 हजार 758 रुपयेही नाहीत 

हिट अँड रन प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जसे की अल्पवयीन आरोपीने त्याच्या मित्रांसह अवघ्या 90 मिनिटांमध्ये 48 हजार रुपये खर्च करून दारू प्यायला. पण आलिशान कारच्या नोंदणीसाठी त्याचे RTOमध्ये 1 हजार 758 रुपयांचे पेमेंट करणे बाकी आहे.

नक्की वाचा: पबमध्ये 48 हजार उडवले, मुलाच्या आजोबांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन; पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट

VIP नंबर प्लेटसाठी खर्च केले 45 हजार रुपये  

अपघातग्रस्त कारवर VIP नंबर प्लेट लावण्यात आली होती. यासाठी गाडीच्या मालकाने 45 हजार रुपये मोजले होते. अशा परिस्थितीत गाडीच्या नोंदणीची रक्कम भरणे बाकी असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

नोंदणी प्रक्रिया देखील अपूर्ण 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, "अपघातग्रस्त पोर्शे कार मार्च महिन्यामध्ये बंगळुरूतील एका डीलरने आयात केली होती. बंगळुरूमधून नोंदणी प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात करून कार महाराष्ट्रात पाठवण्यात आली. पण पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) मिळालेल्या माहितीनुसार नोंदणी शुल्क भरले नसल्याचे आढळले. यानंतर कार मालकाला पैसे देण्यास सांगण्यात आले. तरीही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वाहन आरटीओमध्ये आणले गेले नाही."

Advertisement

(नक्की वाचा: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीचा फास आवळणार!)

पोलिसांचाही बंदोबस्त करण्याचा प्रयत्न? 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीने पैशांचा माज दाखवून प्रकरण बंद करण्यासाठी पोलिसांनाही अनेक ऑफर देण्याचा प्रयत्न केला होता. पण याचा काहीही उपयोग झाला नाही.   

परीक्षा पास झाल्याचा असा केला आनंद साजरा  

पोलीस तपासातील माहितीनुसार, आरोपीने आधी त्याच्या मित्रांसोबत वेगवेगळ्या पबमध्ये बसून पार्टी केली. परीक्षेत पास झाला म्हणून त्यानं ही पार्टी केली. यानंतर मद्यधुंद अवस्थेतही स्वत:च गाडी चालवणार असल्याचे त्याने म्हटले आणि ताशी 200 किलोमीटर वेगाने कार चालवत त्याने बाईकला धडक दिली.

Advertisement

नक्की वाचा: माजी मंत्र्याच्या पत्नीच्या ट्वीटने पुणे अपघातात ट्विस्ट, आणखी एक बाजू आली समोर

नेमके काय घडले?

  • रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोर्शे कार चालक आरोपीने  बाइकला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत बाइकवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. 
  • यानंतर आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. येथे काही अटी-शर्थींसह त्याला जामीन मंजूर करण्यात आला. 
  • सोमवारपर्यंत आरोपीचे वडील ना पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले ना क्राइम ब्रांचसमोर हजर राहिले. 
  • या दिवशी जेबी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये तीन जणांसाठी बुकिंग करण्यात आले होते. 
  • मंगळवारी (21 मे 2024) पोलिसांनी आरोपीच्या वडिलांचा ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराची चौकशी केली. याद्वारे आरोपीच्या वडिलांची माहिती मिळाली.    
  • पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक करून बुधवारी (22 मे 2024) कोर्टासमोर हजर केले. 
  • पोलिसांनी बाल न्याय मंडळासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली.
  • पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले. सर्व आरोपींना 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  
  • जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी 21 मे 2024 दोन्ही पब बंद करण्याचे आदेश दिले.

VIDEO: Pune drunk and drive case | माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे आरोप