Pune News : दिवसभराचा रोजा, तलावाजवळ इफ्तारीची तयारी; 50 जणं दुचाकीवरुन आले अन् पुण्यात तरुणांसोबत भयंकर घडलं 

पुणे जिल्ह्यातील सासवड परिसरात इफ्तारची तयारी करणाऱ्या मुस्लीम तरुणांसोबत धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो - AI Image

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : पुणे जिल्ह्यातील सासवड परिसरात इफ्तारची तयारी करणाऱ्या मुस्लीम तरुणांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्करवाडी भागातील तलावाजवळ ही घटना घडली. फिरोज जावेद सय्यद आणि त्याचे मित्र रोजा सोडण्यासाठी जमले असताना सुमारे ५० जणांचा गट दुचाकींवरून तेथे आला आणि चौकशी करत वाद घालू लागला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून १० ते १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास सुरू आहे.

इफ्तारीची तयारी करीत असताना भयंकर घडलं...


मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण इफ्तारीची तयारी करीत होते. त्याचवेळी ५० जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. या मॉब लिंचिंगमध्ये पाच जण जखमी झाल्याचं सांगितलं झालं आहे. यानंतर पोलिसांनीही १२ ते १५ जणांना ताब्यात घेतलं आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड येथे रमजान महिन्यादरम्यान 'रोजा' सोडण्याची तयारी करणाऱ्या मुस्लीम तरुणांच्या एका गटावर जमावाने कथितरित्या हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत किमान पाच जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सागितलं. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास पुणे सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑस्करवाडी भागात एका तलावाजवळ घडली.

Advertisement

नक्की वाचा - VIDEO : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; इंजिनियरिंगचा अद्भूत नमुना, लवकरच प्रवाशांसाठी खुला, तारीख काय?

15 संशयित ताब्यात...

FIR नुसार, २५ वर्षीय फिरोज जावेद सय्यद या तक्रारदारासह त्याचे सुमारे दहा मित्र तलावाजवळ जमले होते आणि ते उपवास सोडण्याची तयारी करत होते. त्याच वेळी, सुमारे 50 जणांचा एक गट दुचाकींवरून घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी या तरुणांची चौकशी करण्यास सुरुवात केली. शाब्दिक बाचाबाचीचं रूपांतर वादात झालं आणि दोन्ही गटाकडून हाणामारी झाली. सासवड पोलीस ठाण्यात पोलिसांनी 'भारतीय न्याय संहिता' अंतर्गत कलम ११८(१), १८९(२), १९० आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत १० ते १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.