Pune News : 9 वीच्या मुलीनं चक्क शिक्षिकेला केलं प्रपोज, मैत्रिणीला वॉशरुममध्ये गाठले आणि... पुणे हादरले!

Pune News : पुण्यातील एका नामवंत शिक्षण संस्थेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या धक्कादायक वर्तणुकीने सध्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune News : या विचित्र प्रकारामुळे शाळेत भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ( प्रतिकात्मक फोटो)
पुणे:


Pune News : पुण्यातील एका नामवंत शिक्षण संस्थेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या धक्कादायक वर्तणुकीने सध्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी आपल्याच एका शिक्षिकेच्या प्रेमात पडल्याचे समोर आले असून तिने शिक्षिकेला चक्क प्रपोज केले. इतकेच नाही तर या अल्पवयीन मुलीने शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवून स्वतःला इजा करून घेण्यापर्यंत मजल मारली होती. 

या विचित्र प्रकारामुळे शाळेत भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र दामिनी पथकाच्या मध्यस्थीने हा प्रकार वेळीच हाताळण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

संबंधित विद्यार्थिनीने तिच्या शिक्षिकेच्या मोबाईलवर सातत्याने आय लव्ह यू असे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली होती. तुम्ही दुसऱ्या कोणाशीही बोललेले मला आवडत नाही, असे म्हणत तिने शिक्षिकेवर एक प्रकारे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. शिक्षिकेने या मुलीला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तिला अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. 

मात्र, यामुळे ती मुलगी अधिकच आक्रमक झाली. तिने रागाच्या भरात ब्लेडने स्वतःच्या हातावर शिक्षिकेचे नाव कोरले आणि जर शिक्षिकेने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, तर शाळेच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. 'महाराष्ट्र टाईम्सनं' हे वृत्त दिलं आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Student Death: मम्मी-पप्पा, मला माफ करा! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने का संपवले स्वतःचे आयुष्य?, मोठा खुलासा )

मैत्रिणींनाही त्रास

या विद्यार्थिनीच्या वर्तणुकीचा फटका केवळ शिक्षिकेलाच बसला नाही, तर तिच्या वर्गमैत्रिणींनाही याचा मनस्ताप सहन करावा लागला. या मुलीने आपल्या काही वर्गमैत्रिणींना प्रेमाचे मेसेज पाठवले आणि त्यांच्या बोटात अंगठी घालण्याचाही प्रयत्न केला. 

धक्कादायक म्हणजे तिने एका विद्यार्थिनीचा वॉशरूमपर्यंत पाठलाग केला आणि तिथे तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारून घाबरवून सोडले. अभ्यासात लक्ष न देता तासन् तास कॉरिडॉरमध्ये फिरणे आणि शिक्षिकेकडे एकटक बघत राहणे, अशा वागण्यामुळे शाळेतील इतर विद्यार्थीही अस्वस्थ झाले होते.

Advertisement

दामिनी पथकाची समयसूचकता

शाळेतील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शाळा प्रशासनाने तातडीने पुणे पोलिसांच्या दामिनी मार्शल पथकाला पाचारण केले. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अत्यंत संवेदनशीलतेने पावले उचलली. मुलीचे वय लक्षात घेता तिच्यावर कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई न करता तिचे मानसशास्त्रीय समुपदेशन करण्यात आले. तज्ज्ञांच्या मदतीने तिला विश्वासात घेऊन समजावण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

(Pune News : ऑपरेशनमध्ये भयंकर चूक! प्रसूतीनंतर पोटात टॉवेल, महिलेचा जीव गेला; पुण्यातील हॉस्पिटलला मोठा झटका )
 

पालकांसाठी धोक्याची घंटा

पौगंडावस्थेत मुलांच्या मनात निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून निर्माण होणारा भावनिक गोंधळ यातून हा प्रकार घडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा काळात मुलांच्या वागण्यात होणारे बदल पालकांनी वेळीच ओळखणे गरजेचे आहे. मुले कोणाशी बोलतात, मोबाईलवर काय करतात आणि त्यांच्या स्वभावात अचानक चिडचिडेपणा आला आहे का, याकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article