Pune News : आईचा मित्र बनला नराधम,13 वर्षांच्या मुलीला शाळेत नेतो म्हणून भर रस्त्यात कारमध्येच...पुण्यात संताप

Pune Crime News: पुण्यातील वारजे परिसरात एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Crime News: . या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. (प्रतिकात्मक फोटो)
पुणे:

Pune Crime News: पुण्यातील वारजे परिसरात एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ज्या व्यक्तीवर आईने विश्वासाने आपल्या पोटच्या मुलीला शाळेत सोडण्याची जबाबदारी सोपवली, त्याच नराधम मित्राने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात कारमध्ये अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले असून रक्षकच भक्षक बनल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई ही 32 वर्षीय विधवा असून आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर हा तिचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा मित्र आहे. कौटुंबिक ओळखीमुळे आणि जुन्या मैत्रीमुळे आईचा ज्ञानेश्वरवर पूर्ण विश्वास होता. 

याच विश्वासापोटी तिने आपल्या 13 वर्षांच्या मुलीला त्याच्यासोबत जाण्यास परवानगी दिली होती. आरोपीने देखील मी मुलीला शाळेत सोडतो असे सांगून तिला आपल्या सोबत घेतले. मात्र, शाळेत नेण्याऐवजी तो तिला डीपी रोड परिसरात घेऊन गेला.

( नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )
 

भररस्त्यात कार थांबवून अत्याचार

ज्ञानेश्वरने त्याची कार डीपी रोडवर एका बाजूला उभी केली आणि भररस्त्यात गाडीमध्येच या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर त्याने पीडित मुलीला धमकी दिली की, याबद्दल कोणाला काही सांगितले तर तुला बघून घेईन. या धमकीमुळे ती अल्पवयीन मुलगी प्रचंड हादरून गेली होती. आरोपीने तिला शाळेत सोडले खरे, पण या कृत्यामुळे तिला शाळेत पोहोचायला उशीर झाला.

Advertisement

आईच्या सतर्कतेमुळे फुटली वाचा

मुलगी रोजच्या वेळेपेक्षा उशिरा म्हणजे सकाळी 7 ऐवजी 7:30 वाजता शाळेत पोहोचल्याचे आईच्या लक्षात आले. मुलगी घरी परतल्यानंतर आईने तिला या अर्ध्या तासाच्या विलंबाबद्दल विचारणा केली. 

आईने जाब विचारताच मुलगी घाबरली आणि तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मुलीच्या वागण्यातील बदल आणि चेहऱ्यावरची भीती पाहून आईला संशय आला. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, नराधम ज्ञानेश्वरने केलेल्या कृत्याचा पाढाच मुलीने वाचला.

Advertisement

( नक्की वाचा : Sambhajinagar: तक्रारीसाठी गेली अन् गळ्यात पडलं बनावट मंगळसूत्र; PSI नं केलं तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त )
 

आरोपीला बेड्या आणि पोलीस तपास

आपल्या मुलीसोबत घडलेला हा प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने कोणतीही वेळ न घालवता थेट वारजे पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. वारजे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून 29 वर्षांचा आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला तातडीने अटक केली आहे. पोलीस आता या प्रकरणातील अधिक पुरावे गोळा करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

Topics mentioned in this article