Pune Crime : पुण्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण भर रस्त्यावर वाहतुकीदरम्यान एका तरुणीला वारंवार लाथा-बुक्क्या मारताना दिसत आहे. पुणे शहराच्या केके मार्केट (KK Market) परिसरात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहेय
काय आहे प्रकार?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजता पुणे-सातारा रोडवरील केके मार्केट (KK Market) ते चव्हाण नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. हा प्रकार दूरून एका वाटसरूने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एक तरुण दुसऱ्या कोणाला तरी पकडण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती व्यक्ती त्याच्या हातून सुटून पळून जाते. यानंतर, अचानक एक तरुणी तिथे येते आणि त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न करते. त्याच क्षणी, तो तरुण त्या तरुणीला जोरदार मारहाण करण्यास सुरुवात करतो.
( नक्की वाचा : CCTV Video: अंबरनाथमध्ये थरार! लोकल येत असताना ट्रॅकवर उडी घेणाऱ्या चेन स्नॅचरला GRP-RPF ने पाठलाग करत पकडले )
तरुणी कशीबशी स्वतःची सुटका करून घेते आणि एका ऑटो रिक्षात बसून तिथून निघून जाते. पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी सुरू आहे. भर रस्त्यावर तरुणीला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण करणारा तरुण कोण आहे आणि या मारहाणीमागील नेमकं कारण काय होतं, याबाबत कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही. याप्रकरणी आतापर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, पुणे पोलीस या व्हायरल व्हिडिओची (Viral Video) गांभीर्याने दखल घेऊन त्याची पडताळणी (Verification) करत आहेत.
पोलिसांनी काय सांगितलं?
पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी या घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत या प्रकरणात कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. तरीही, पोलीस या व्हिडिओच्या आधारावर अधिक माहिती गोळा करत आहेत."
इथे पाहा Video