मेहबूब जमादार
एक छोटी खोली भाड्याने घेण्यात आली. त्याच खोलीत कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीने आमली पदार्थ बनवले जात होते. पण गावातल्या गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या अंमली पदार्थाच्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली. इथं ताडवाडी आहे. इथल्या एका छोट्या 10x12 च्या घरात हा अंमली प्रदार्थ बनविण्याच्या कारखाना सुरू होता. नेरळ पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने हा कारखाना उद्धवस्त केला. स्थानिक ग्रामस्थांना रविवारी रात्रीच्या सुमारास त्या घरात काहीजण डोक्यावर खोकी वाहून नेत असल्याचे दिसून आले होते. शिवाय बंद घरात काही संशयस्पद हालचाली आढळल्याचं ही गावकऱ्यांना दिवसं. त्यानंतर त्या घराला रात्री साडे बारा वाजता ग्रामस्थानी घेराव घातला. तिथे असलेल्या पाच तरुणांना त्यांनी पकडलं. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांनी फोन करून त्याची माहिती दिली. त्या घरात रसायन मिश्रित अंमली प्रदार्थ बनवले जात असल्याचं उघड झालं. घटनास्थळी नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे आपल्या टीम समवेत घटनास्थळी दाखल होऊन, पाच लोकांना ताब्यात घेतले.
पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी या आदिवासी वाडीत ही घटना घडली. गावापासून काही अंतरावर शेतामध्ये निर्जनस्थळी लक्ष्मण फसाळ या आदिवासी व्यक्तीचे घर आहे. घराच्या अजूबाजूला शेती आहे. हे घर मुंबईत राहाणाऱ्या एका व्यक्तीने भाड्याने घेतले होते. या घरात काही लोक वर्षभरापासून राहत ही होते. 10 ऑगस्टच्या मध्यरात्री त्या ठिकाणी एक मारुती कार आली. ही गाडी काही अंतरावर उभी करण्यात आली. शिवाय त्यांच्यासोबत एक रुग्णवाहीकाही होती. त्यातून काही खोकी बाहेर काढण्यात आली. ही बाब गावकऱ्यांनी पाहिली. त्या घरात काही तरी संशयास्पद घडत आहे असं गावकऱ्यांना संशय आला. ताडवाडी येथील काही तरुणांनी गावात ही माहिती ग्रामस्थांना दिली.
लगेच गावकऱ्यांनी या घराला घेराव घातला. नंतर घरावर हल्लाबोल केला. त्यावेळी तेथे पाच जण एक केमिकल बनवत होते. निळे, पिवळे, सफेद रंगाचे रसायन एका विशिष्ट भांड्यात ठेवून त्यांना इलेक्ट्रिक माध्यमातून उकळविले जात होते. याबाबत तरुणांनी नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील कळंब या पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी ही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रसायनातून उग्र वास येत होता. अटक केलेल्या आरोपींनी तिथले काही रसायन जमिनीवर ओतले. आपले मोबाईल देखील फोडले. पोलिसांनी काही मोबाईल ताब्यात घेतले आहे. शिवाय रसायनही जप्त केले आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या सापडून आल्या आहेत. एका सिमेंट गोणीमध्ये हे बर्फ आणल्याचे दिसून आले. पुठ्ठ्याचे खोके येथे भरलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडून आले. नेरळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवाजी ढवळे यांना त्या ठिकाणी बर्फाच्या लाद्या आणि रसायने पाहून हा आमली प्रदार्थ बनविण्याचा प्रकार असल्याचा प्रथम संशय आला. फॉरेन्सिक टीमला तपासासाठी घटनास्थळी प्राचारण करण्यात आले. तसेच खोपोलीहून काही केमिकल एक्सपर्ट बोलावण्यात आले होते. नेरळ पोलिसांनी त्या ठिकाणीहुन अंमली पदार्थ बनविण्याऱ्या कारखान्यातील साहित्य ताब्यात घेतले आहे. दोन महिन्यापूर्वी याच परिसरातील 8 किलोमीटरवर एका फार्महाऊसवर मुंबई पोलिसांनी धाड टाकून 22 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. ताब्यात घेतलेल्या पाच जणांमध्ये एक जण हा डी फार्मसी शिक्षण घेतलेला तरुण आहे.