ती अल्पवयीन, आधी मैत्री मग प्रेम, गर्भवती राहिली अन् पुढे भयंकर घडलं

ओळखीचे रूपांत मैत्रीत झाले. पुढे ही मैत्री बहरली आणि ते एकमेकाच्या प्रेमात पडले. ते एकमेकाच्या प्रेमात इतके वाहत गेले की आपण काय करत आहोत याचे भानही त्यांना राहीले नाही. शेवटी नको तेच झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे

रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ती अल्पवयीन होती.नुकताच तिने कॉम्प्युटर क्लासही लावला होता. त्याच वेळी तिला तो भेटला. दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांत मैत्रीत झाले. पुढे ही मैत्री बहरली आणि ते एकमेकाच्या प्रेमात पडले. ते एकमेकाच्या प्रेमात इतके वाहत गेले की आपण काय करत आहोत याचे भानही त्यांना राहीले नाही. शेवटी नको तेच झाले. ती गर्भवती राहील. हे दोघांनाही समजले. त्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पुढे काय करायचे हा विचार त्यांनी केला. मात्र पुढे जे काही झालं ते सर्वांनाच हादरवून सोडणारं होतं. 

ट्रेंडिंग बातमी - पावसात खेळू नकोस,पालकांनी खडसावले, 13 वर्षाच्या मुलीने थेट...

श्रीवर्धन इथं राहणारी अल्पवयीन तरूणी. तिची ओळख एका तरूणा बरोबर झाली. त्यांची त्यातून मैत्री झाली. क्लासच्या निमित्ताने ते नोव्हेंबर 2023 ते मे 2024 पर्यंत श्रीवर्धन इथे राहात होते. त्याच वेळी या दोघांमध्ये संबधी निर्माण झाले. त्यामुळे ती तरूणी गर्भवती राहिली. हे समजात तो मुलगा तिला नवी मुंबईतल्या वाशी इथे घेवून आला. 18 जुलै 2024 रोजी वाशी येथे ती प्रसूती झालेल्या मुलासह बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ज्या बाळाला तीने जन्म दिला होता ते दोन दिवसांनी मरण पावले. सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र वैद्यकीय अहवालानंतर कथित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मोठी अपडेट! लाडकी बहीण योजनेत आता 6 नवे बदल, आता नव्या अटी-शर्ती

वाशी पोलिस स्टेशनच्या टीम सदस्याच्या तक्रारीच्या आधारे कथित आरोपीविरुद्ध बी.एन.एस आणि पोक्सो कायद्याच्या कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी दिघी पोलीस स्टेशन, रायगड येथे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की नोव्हेंबर 2023 ते मे 2024 दरम्यान, पीडित तरूणीवर आरोपीने श्रीवर्धन येथे दोन वेळा अत्याचार केला होता. त्यामुळेच ती गर्भवती राहील होती. त्यानंतर त्या तरूणाने तिला वाशी इथे ठेवले होते. तिथेच तिची प्रसुती झाली आणि तिचा मृत्यूही झाला. त्यात तिच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. 

Advertisement

Advertisement