Crime News : राजस्थानमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे एका तरुणाने आपल्या ९ वर्षांच्या मुलीची हत्या केली. पत्नीसोबत झालेल्या वादातून तरुणाने हे धक्कादायक पाऊल उचललं. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी बापाने लेकीचा मृतदेह गर्द झाडांमध्ये फेकून दिला.
चौथीत शिकणाऱ्या लेकीचा संपवलं....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबरला अलवरच्या प्रतापगढ येथील एका गावात चौथीत शिकणाऱ्या मुलीचा मृतदेह झाडांमध्ये सापडला. तपासादरम्यान मुलीच्या बापानेच तिची हत्या केल्याचं उघड झालं. तपासानुसार, तरुणाची पत्नी माहेरी गेली होती. ती काही केल्या सासरी येत नव्हती. पत्नीला बोलावण्यासाठी त्याने लेकीची हत्या केली. शुक्रवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितलं, गुरुवारी सकाळी मुलगी बकरी चारण्यासाठी घरातून निघाली होती. त्यावेळी आरोपी पिता तिच्या मागे गेला आणि घरापासून साधारण ४०० मीटर दूर तिचा गळा दाबून हत्या केली. गळा दाबताना मुलीच्या मानेचं हाड तुटलं. आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. साधारण सात दिवसांपूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती.
नक्की वाचा - Crime News: आई शेतात, वडील पानटपरीवर.. घरात रक्ताचा सडा, 12वीतील मुलीसोबत भयंकर घडलं
आरोपी पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. मृत मुलीच्या आईने सांगितसं, सात दिवसांपूर्वी आरोपीने तिला मारहाण केली होती. आरोपी पती नशादेखील करीत होता. पती पत्नीला घेण्यासाठी तिच्या माहेरीही गेला होता. मात्र माहेरच्यांनी मुलीला पाठवलं नाही. आरोपीने पत्नीला बोलावण्यासाठी अनेर प्रयत्न केले. मात्र तरीही ती परतली नाही. यानंतर आरोपीने मुलीच्या हत्येचा प्लान आखला. लेकीच्या हत्येमध्ये दु:खी झालेली पत्नी आपल्याकडे येईल असा विचार करून त्याने मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world