Uttar Pradesh Crime News: नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत घृणास्पद घटना उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात घडली आहे. दारू किंवा पैशांच्या हव्यासापोटी एका व्यक्तीने आपल्या 30 वर्षीय पत्नीला अवघ्या 1000 रुपयांसाठी स्वतःच्या मित्रांच्या स्वाधीन केले. यानंतर त्या दोन मित्रांनी महिलेला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेने हिंमत दाखवत पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
फैजगंज बेहटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने रविवारी संध्याकाळी आपल्या पतीविरुद्ध आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्या पती छट्टन याने तिला 1000 रुपयांच्या बदल्यात आपल्या दोन मित्रांसोबत पाठवून दिले. आरोपी बालकिशन आणि पप्पू यांनी तिला नीलगिरीच्या झाडांच्या बागेत नेले आणि तिथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
(नक्की वाचा- UP News: रात्री झोपी गेलेली तरुणी बनली 'नागीण'! सकाळी बेडरुमधील दृश्य पाहून अख्ख गाव हादरलं)
पोलिसांनी केली तातडीने कारवाई
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून बालकिशन आणि पप्पू या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित महिलेला सोमवारी जिल्हा महिला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पत्नीचा सौदा करणारा नराधम पती छट्टन सध्या फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना केली आहेत.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)
दोन मुख्य आरोपींना अटक करून त्यांची चौकशी सुरू आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे अधिक कठोर कायदेशीर पावले उचलली जातील, असं पोलिसांना सांगितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world