ब्युटीशियनच्या मृतदेहाचे केले 6 भाग, प्लास्टिकच्या पिशवीत भरून केलं दफन; थरकाप उडवणारा प्रकार

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली 50 वर्षीय महिला अनिता चौधरी हिच्या मृतदेहाचे सहा तुकडे शहरातील एका भागातून सापडले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
जयपूर:

राजस्थानातून एक भयावह घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली 50 वर्षीय महिला अनिता चौधरी हिच्या मृतदेहाचे सहा तुकडे शहरातील एका भागातून सापडले आहेत. आरोपीच्या घराजवळील खोल खड्ड्यात प्लास्टिकच्या पिशवींमध्ये महिलेच्या शरीराचे अवयव सापडले आहेत. या घटनेमागे गुल मोहम्मद याचा संबंध असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. संशयास्पद आरोपीचा शोध सुरू आहे. 

आरोपीच्या पत्नीमुळे बिंग फुटलं...
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता चौधरी ही 27 ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. तिचा पती मनमोहन चौधरीने याबाबत सरदारपुरा पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अनिताच्या फोनमुळे तिने गुल मोहम्मद याच्याशी संपर्क केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी गुल मोहम्मद याच्या घरात छापा टाकला. सुरुवातील गुल मोहम्मद याच्या पत्नीने काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच तिने सर्व खरं सांगितलं.  माझ्या पतीने अनिताची हत्या करून तिला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून दफन केल्याचं सांगितलं. 

नक्की वाचा - बिर्याणी खाण्यास नकार दिला, पतीने लाथाबुक्क्यांनी केलेल्या हाणामारीत पत्नीचा मृत्यू

अनिता ब्युटीपार्लर चालवायची...
पोलिसांच्या टीमने जेसीबीच्या मदतीने 12 फूट खड्ड्यात खोदकाम केलं. या खड्ड्यात प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मृतदेहाचे अवयव दिसले. मृतदेहाचे सहा भाग करण्यात आल्याचं तपासात सपजलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. अनिता चौधरी सरदारपुरा बी रोड येथील अग्रवाल टॉवरमध्ये आपलं ब्युटीपार्लर चालवित होती. आरोपी गुल मोहम्मदचं दुकानही त्याच टॉवरमध्ये होतं. त्यामुळे दोघे एकमेकांना ओळखत होते. 28 ऑक्टोबर अनिता शेवटी आपल्या ब्युटी पार्लरमधून निघाली होती. ज्यानंतर ती घरी परतली नाही. अनिताचा पती मनमोहनने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनिता ऑटोमध्ये जाताना दिसत होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, आधीच हत्येचा प्लान करण्यात आला होता. हत्येपूर्वीच आरोपीने आपल्या घराजवळ एक खड्डा खोदला होता. पोलिसांकडून  आरोपीचा शोध सुरू आहे. 

Advertisement