जाहिरात

बिर्याणी खाण्यास नकार दिला, पतीने लाथाबुक्क्यांनी केलेल्या हाणामारीत पत्नीचा मृत्यू

सविताने बिर्याणी खायला नकार दिल्याने अजय संतापला होता. संतापाच्या भरात त्याने सविताला जीव जाईपर्यंत मारहाण केली. सदर प्रकरणात अजयला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्याला 7 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

बिर्याणी खाण्यास नकार दिला, पतीने लाथाबुक्क्यांनी केलेल्या हाणामारीत पत्नीचा मृत्यू

बिर्याणी खायला नकार दिल्याने नवरा भडकला आणि त्याने रागाच्या भरात बायकोला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नाजूक भागांवर लाथाबुक्के बसल्याने ही महिला जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अजय अडसूळ असं नवऱ्याचं नाव असून सविता अडसूळ असं मृत महिलेचे नाव आहे. अजय हा 43 वर्षांचा असून तो परळमध्ये राहतो. न्यायालयाने अजयला 7 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2019 मध्ये अजय आणि सवितामध्ये भांडण झालं होतं. सविताने बिर्याणी खायला नकार दिल्याने अजय संतापला होता. संतापाच्या भरात त्याने सविताला जीव जाईपर्यंत मारहाण केली. सदर प्रकरणात अजयला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्याला 7 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.   न्यायाधीश ए.एस.सलगर यांनी निकाल देताना म्हटले की सविताचा खून करण्याचा किंवा गुन्हा करण्याचा अजयचा कोणताही मानस नव्हता. सविताला ठार मारण्यासाठी अज्यकडे कारणही नव्हते. इथे कारण इतकेच होते की सविताने बिर्याणी खावी असे अजयला वाटत होते. सविताने नकार दिला ज्यावरून वाद झाला आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला. 

(नक्की वाचा-  मोमोज जीवावर बेतले! महिलेचा मृत्यू, 40 जणांची तब्येत बिघडली)

न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले की पुराव्यातूनहेच दिसून येत आहे की अजय आणि सवितामध्ये भांडण झाले. हे भांडण अचानक सुरू झाले होते. अजयने सविताला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याने सविताचे भिंतीवर डोकंही आपटलं होतं आणि या मारहाणीत सविताचा मृत्यू झाला. आपल्या मारहाणीमुळे सविताचा मृत्यू होऊ शकतो हे अजयला माहिती होतं तरीही त्याने मारहाण केली असे निकालात म्हटले आहे.    

(नक्की वाचा-  मालाडचा तरुण कामासाठी कल्याणमध्ये आला, भर रस्त्यात घडला भयंकर प्रकार!)

अजयने सविताला मारहाण करत असताना हत्याराचा वापर केला नव्हता ज्यामुळे हे दिसून येते की सविताचा खून करावा असा अजयचा कोणताही मानस नव्हता असे न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले आहे. सदर घटना 20 डिसेंबर 2019 मध्ये घडली होती. सविता जागेवर कोसळल्यानंतर अजयने तिला रुग्णालयात नेले होते, पोलिसांना अजयने सांगितले की बाथरूममध्ये घसरल्याने सविता जखमी झाली आहे. मात्र तपासामध्ये अजयने केलेल्या मारहाणीतच ती जखमी झाली होती आणि मारहाणीमुळेच तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com