उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील निळा ड्रम मुस्कान कांडने देश हादरून गेला होता. आता राजस्थानमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता राजस्थानमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे रविवारी खोलीच्या छतावर ठेवलेल्या निळ्या प्लास्टिक ड्रममधून ३५ वर्षीय तरुण हंसरामचा मृतदेह सापडला आहे. ड्रममध्ये तरुणाचा मृतदेह सापडताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या खळबळजनक घटनेमुळे लोकांना मेरळमधील निळ्या ड्रम कांडची आठवण आली आहे. मेरठमध्ये पत्नीने आपल्या पतीची हत्या करीत त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हंसराम हा उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरचा राहणारा होता. तो गेल्या सहा महिन्यापासून पत्नी आणि तीन मुलांसह आदर्श कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. तो स्थानिक किराण्याच्या दुकानात काम करीत होता. शनिवारी रात्री घर मालकाच्या घराचं दार उघडं होतं आणि आत दुर्गंधी येत होती. वर जाऊन लक्षात आलं की, निळ्या ड्रममधून तीव्र दुर्गंधी येत आहे. स्थानिकांनी संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ड्रम उघडून पाहिलं तर एक मृतदेह मिठामध्ये ठेवला होता.
नक्की वाचा - Crime News: इंस्टाग्रामवर मैत्री, ब्लॅकमेल अन् अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पुढे जे घडलं ते...
मिठामध्ये तरुणाचा मृतदेह
या प्रकरणात पतीची हत्या केल्यानंतर त्याला ड्रममध्ये घालून वरुन मीठ टाकण्यात आलं. जेणेकरून मृतदेहातून येणारा वास बाहेर पसरू नये आणि मृतदेह बराच काळ लपवता येईल. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मृताची पत्नी आणि तिन्ही मुलं बेपत्ता आहेत. आता पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे आणि हत्येच्या दिशेने प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल असे पोलीस स्टेशन प्रभारी नीरज यांनी सांगितले.
आतापर्यंत काय आलंय समोर
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, हंसराम याची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली आणि मृतदेह लपविण्यासाठी निळ्या ड्रममध्ये टाकण्यात आला. या घटनेनंतर मृत व्यक्तीची पत्नी आणि तिन्ही मुलं बेपत्ता आहेत. तर घर मालकाचा मुलगाही बेपत्ता झाल्याची माहिती आहे. घर मालकाच्या पत्नीला जेव्हा ड्रममधून दुर्गंध येऊ लागला, यानंतर तिने पोलिसांना याबाबत सूचना दिली. एफएसएलची टीम घटनास्थळी पोहोचली असून ते तपास करीत आहेत.
निळ्या ड्रमच्या आठवणी
या हत्याकांडामुळे मुस्कान हत्याकांडाची आठवण आली आहे. मुस्कानने पतीची हत्या करीत त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवला होता.