
एका अल्पवयीन मुलीसोबत सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण ही केले. त्यानंतरही शोषण सुरू होते. त्याच बरोबर ब्लॅकमेल ही केले जात होते. या प्रकरणी 26 वर्षीय एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना आसामच्या गुवाहाटीत घडली. पण सीआयडीने आरोपीला थेट मध्य प्रदेशातून अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी हा देवासचा रहिवासी आहे. त्याची 2021 मध्ये इंस्टाग्रामवर त्या मुलीशी ओळख झाली. ती मुलगी आसामच्या गुवाहाटीची रहीवाशी आहे. ओळख झाल्यानंतर ते दोधे मित्र बनले. तो मार्च 2022 मध्ये मुलीला भेटण्यासाठी गुवाहाटीला आला होता. त्यावेळी त्याने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यानंतर तो तरुण तिला व्हिडिओ कॉलवर येण्यासाठी ब्लॅकमेल करू लागला. धमकी देऊ लागला की जर तिने त्याचे ऐकले नाही, तर तो 'लैंगिक शोषणाचे' फोटो आणि व्हिडिओ तिच्या मित्र आणि पालकांसोबत शेअर करेल.
नक्की वाचा - Kalyan News: खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी, शिंदेंच्याच कार्यकर्त्याचा एकुलता एक लेक गेला
2024 मध्ये, तो तरुण पुन्हा एकदा मुलीला भेटायला गुवाहाटीला आला. परंतु तिने त्याला भेटण्यास नकार दिला. पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर आरोपीने लैंगिक शोषणाचे व्हिडिओ शेअर करण्यासाठी बनावट सोशल मीडिया अकाउंट्स तयार करण्यास सुरुवात केली. मुलीच्या वडिलांनी 6 ऑगस्ट रोजी या विरोधात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे, सीआयडीच्या सायबर पोलिस ठाण्यात लैंगिक गुन्ह्यांपासून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा घडला तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. पुढे सीआयडीच्या एका टीमने देवासला जाऊन 13 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक केली.
पोलिसांनुसार, अटक केल्यानंतर, आरोपीने स्वतःला अल्पवयीन सिद्ध करण्यासाठी बनावट कागदपत्रे दाखवून चुकीचे वय सांगितले. परंतु सीआयडी टीम त्याच्या शाळेत गेली. त्याचे वय प्रमाणपत्र मिळवले. ज्यानुसार त्याचे वय 26 वर्षे आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याला ट्रान्झिट रिमांडवर गुवाहाटीला आणले जात आहे. विशेष पॉक्सो न्यायालयात हजर केले जाईल. या घटनेनंतर सोशल माडियीवर मैत्री करणे किती योग्या आहे याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय सोशल मीडियाच्या वापरावरही आता प्रश्न निर्माण झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world