उद्या 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईला येत असतात. त्यामुळे एक्स्प्रेस आणि रस्त्यांवरही मोठी गर्दी होत असते. दरम्यान अमरावतीवरुन मुंबईला येणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसमधील (Rajya Rani Express) दोन गटात वाद झाल्याने एकावर गंभीर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नक्की वाचा - पेट्रोल चोरल्याचा संशय, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; पुण्यातील घटनेने खळबळ
गर्दीत चोरीच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. या वादात एका प्रवाशावर चाकूने हल्ला करण्यात आला. यामुळे बसलेल्या प्रवाशांनी चक्क राज्य राणी एक्सप्रेस नाशिकच्या खेरवाडी रेल्वे स्टेशनवर थांबविल्याचे समजते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे चैत्यभूमीवर जात असताना रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यातच चोरीच्या कारणावरुन हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यानंतर संतप्त प्रवाशांनी नाशिकच्या खेरवाडी रेल्वे स्टेशनवर रेल रोको केला. दोन गटांमधील हाणामारीत एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमी प्रवाशाला तातडीने रुग्णवाहिकेतून हलवण्यात आलं.