Ratnagiri Crime: इंटरनेटवर मुलाचाच नको तो VIDEO दिसला, पित्याच्या पायाखालची जमीन सरकली; नराधमांची भयंकर विकृती

नराधम आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मात्र पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी:

Ratnagiri Crime:  ​रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोघा तरुणांना बेड्या ठोकल्या. या किळसवाणा प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुलासोबत विकृत कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारी २०२६ घडली. राजीवडा येथील जुबेर सलीम शेख आणि मुस्तकीन गडकरी या दोघांनी एका अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पीडित बालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने सुरुवातीला या प्रकाराची कल्पना आपल्या पालकांना दिली नव्हती.

Advertisement

VIDEO: 'बाजूला हो' म्हटल्याचा राग, गरीब वेटरला उचलून आपटलं, लाथाबुक्क्यांनी मारलं, बीडमधील संतापजनक घटना

मात्र, नराधम आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मात्र पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. कारण व्हिडिओतील बालक त्यांचा स्वतःचा मुलगा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणभरही विलंब न लावता थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.

दोन्ही आरोपींना अटक

पालकांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी जुबेर शेख आणि मुस्तकीन गडकरी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह अत्यंत कडक अशा बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. त्यांनी हा व्हिडिओ आणखी कुठे प्रसारित केला आहे का, याचा तांत्रिक तपास पोलिस करत आहेत.

Pune New IT Park: हिंजवडी विसरा, पुण्यात 1500 एकरांवर होणार नवीन IT पार्क; लोकेशन काय?

Topics mentioned in this article