जाहिरात

VIDEO: 'बाजूला हो' म्हटल्याचा राग, गरीब वेटरला उचलून आपटलं, लाथाबुक्क्यांनी मारलं, बीडमधील संतापजनक घटना

जिन्यावरून खाली घेऊन येत असताना पायरीवरून बाजूला हो असं बोलण्याचा राग मनात धरून तीन ते चार जणांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

VIDEO: 'बाजूला हो' म्हटल्याचा राग, गरीब वेटरला उचलून आपटलं, लाथाबुक्क्यांनी मारलं, बीडमधील संतापजनक घटना

आकाश सावंत, बीड:

Beed VIDEO:  बीडमधील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. क्षुल्लक कारणावरुन बीडमध्ये खून, मारामाऱ्यांचे गंभीर प्रकार घडत आहेत. अशीच धक्कादायक घटना बीडच्या तेलगाव येथे घडली आहे. किरकोळ वादातून हॉटेलमधील वेटरला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. 

गरीब वेटरला आपटून आपटून मारलं

समोर आलेल्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून बीडच्या तेलगाव येथे हॉटेलमधील वेटरला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीची सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, खाली पाडून लाथाबुकाने मारताना दिसत आहे. सागर विजय जाधव वेटरच नाव आहे.  तेलगाव येथील त्रिमूर्ती ज्युस सेंटरमध्ये रिकामे ग्लास जिन्यावरून खाली घेऊन येत असताना पायरीवरून बाजूला हो असं बोलण्याचा राग मनात धरून तीन ते चार जणांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Kalyan News : शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, प्रवाशांची धाकधूक वाढली, कल्याणमध्ये काय घडलं? 

धक्कादायक सीसीटीव्ही समोर 

या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे, ज्यामध्ये दोन तरुणांकडून वेटरला बेदम मारहाण होत असल्याचे दिसत आहे. फक्त पायऱ्यांवरुन बाजूला हो म्हणल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांपैकी एका तरुणाने वेटरला उचलून आपटले तसेच खाली पाडून लाथाबुक्क्याही घातल्या. मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी झाल्याचेही दिसत आहे. 

दरम्यान, जखमी तरुण हा बीड तेलगाव सरस्वती विद्यालय येथे शिक्षण घेत एका हॉटेलवर वेटरच काम करत आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून कष्ट करून शिक्षण घेत होता त्याला मारहाण झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून असून गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Palghar Accident: हृदयद्रावक! 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू, पोलिसांच्या भितीने पळताना अनर्थ घडला?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com