Ratnagiri News: पैशांचा मोह नडला, मुलाने बापाला इमारतीतून खाली पाडला! रत्नागिरीतील घटना वाचून बसेल धक्का

Ratnagiri News: रत्नागिरी रेल्वे स्टेशनजवळ पैशांसाठी मुलाने वडिलांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आलीय, सविस्तर बातमी वाचा...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ratnagiri News: रत्नागिरीमध्ये मुलानेच वडिलांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले"

- राकेश गुढेकर, प्रतिनिधी

Ratnagiri News: खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पोटच्या मुलाने जन्मदात्या वडिलांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली आहे. या अमानवीय कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात 21 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाने बापावर काढला राग

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वे स्टेशन लगतच्या परिसरात मनोज प्रभाकर सणस हे आपल्या मुलासोबत राहत होते. त्यांचा मुलगा प्रणय मनोज सणस याने वडिलांकडे खर्चासाठी पैशांची मागणी केली होती. पण काही कारणास्तव वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून प्रणयने आपल्या वडिलांशी हुज्जत घालत त्यांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलले. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी मुलाने तिथून पळ काढला.

Advertisement

(नक्की वाचा: Mira Road Shocker: मीरा रोड प्रकरणाचं धक्कादायक वास्तव उघड, आरोपीकडे आढळले ISISशी संबंधित साहित्य, कलमा न वाचल्याने चाकूहल्ला?)

जखमी बाप रात्रभर जागेवरच होता पडून 

धक्कादायक बाब म्हणजे गंभीर जखमी झालेले मनोज सणस उपचाराविना संपूर्ण रात्र त्या पडक्या इमारतीमध्ये वेदनेने विव्हळत पडून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कशीबशी शुद्ध आल्यानंतर त्यांनी आपले मित्र दीपक घाटगे यांना फोन करून मदतीसाठी बोलावले. दीपक घाटगे यांनी घटनास्थळी धाव घेत 108 क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि जखमी मनोज यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Photo Credit: NDTV Marathi

मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी मनोज सणस यांचा सविस्तर जबाब नोंदवला. वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी प्रणय सणस याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या जखमी वडिलांवर उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोटच्या मुलानेच पैशांसाठी वडिलांवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्याने रत्नागिरी शहर हादरले आहे.

Topics mentioned in this article