Ratnagiri news: पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला चोप, रत्नागिरीतली घटना

पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची निंदा करणाऱ्या तरुणाला रत्नगिरीकरांनी चोप दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानविषयी प्रेम दाखवणाऱ्या तरुणाला देशप्रेमी रत्नागिरीकरांनी इंगा दाखवला आहे. समाजमाध्यमांत पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची निंदा करणाऱ्या तरुणाला रत्नगिरीकरांनी चोप दिला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शहर पोलिस ठाण्यात या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच तो ज्या आस्थापनेत कामाला होता तेथून त्याला काढून टाकण्यात आले आहे. महम्मद बद्रुद्दीन परकार असं त्याचं नाव आहे. तो 21 वर्षाचा असून तो चिपळूणचा राहाणारा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

ही घटना बुधवारी रात्री समोर आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. एका मुस्लीम युवकाने उघडपणे ‘पाकिस्तान जिंदाबाद. मोदी किलर आहे. मोदी मुळे हे घडत आहे.पाकिस्तानसाठी प्रार्थना करा' असे स्टेट्स या तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपला ठेवले होते. त्यानंतर ते व्हायरल ही केले होते. यामुळे खळबळ उडाली. 

ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension: पाकिस्तानचं F-16 विमान भारताने क्षेपणास्त्रानं पाडलं

देशप्रेमी रत्नागिरीकरांच्या ही गोष्ट लक्षात आली. हा तरुण एका प्रसिद्ध आस्थापनेत काम करतो. त्या आस्थापनेत जाऊन रत्नागिरीकरांनी माहिती घेतली असता त्या युवकाला स्टेटसमुळे आदल्या दिवशीच कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या युवकाला देशप्रेम शिकवण्याचा निश्चय केलेल्या रत्नागिरीकर देशप्रेमी तरुणांनी त्या तरुणाला आज शोधून काढले. त्यानंतर त्याला यथेच्छ चोप दिला. त्याने त्यानंतर भारत माता की जय म्हटले. 

ट्रेंडिंग बातमी - Big News : पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारतानं परतवला, जम्मू ते जैसलमेरपर्यंत चोख उत्तर

रत्नागिरीकर देशप्रेमी तरुणांनी चोप दिल्यानंतर जखमी अवस्थेत तरुणाला पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने दंगा काबू पथकाला पाचारण केले आहे. दंगा काबू पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयाचा ताबा घेतला होता. शहर पोलिस निरीक्षक शिवरेकर यांच्यासह पोलिस पथकही याठिकाणी दाखल झाले होते. शहर पोलिस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement