
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरून गेला आहे. त्यानंतर ही त्याचे नापाक कारस्थाने सुरूच आहेत. आधी पाकिस्तानने ड्रोनच्या सहाय्याने भारतातल्या 15 शहरांना लक्ष्य केलं होते. त्यानंतर त्यांचा तो डाव ही भारतीय सैन्याने उधळून लावला. पाकिस्तानचे ड्रोन उडवून लावण्यात आले. पाकिस्तानचे मोठा हल्ला करण्याचे स्वप्न भारतीय सैन्याने धुळीस मिळवले. त्यामुळे पाकिस्तान आणखी चिडला. हे कमी की काय भारताने पाकिस्तानचे F-16 हे विमान ही क्षेपणास्त्रानं पाडलं आहे. आतापर्यंत भारताने पाकिस्तानची चार विमानं पाडली आहेत. F-16, JF-17 फाइटर प्लेनचा यात समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानी हवाई दलाचे F-16 सुपरसोनिक लढाऊ विमान संध्याकाळी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीने पाडण्यात आले. अशी माहिती एनडीटीव्हीला सुत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे. हे एफ-16 विमान पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरून उडाले होते. ते पाकिस्तानी हवाई दलाचे एक महत्त्वाचे हवाई केंद्र आहे. भारतीय एसएएम (Surface-to-air missile) ने हे लढाऊ विमान सरगोधा हवाई तळाजवळ पाडले, असे सूत्रांनी सांगितले आहे.
पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर देत त्यांचे सर्व मनसूबे उधळवून लावले आहेत. पाकिस्ताननं सीमा भागात ही सीझ फायरचं उल्लंघन करणे सुरुच ठेवले आहे. तीथे जोरदार गोळीबार केला जात आहे. त्यात निष्पाप नागरिकांचाही बळी गेला आहे. तर संध्याकाळच्या वेळी जम्मू काश्मीरमध्ये ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. पण हा हल्ला भारताने उधळवून लावला आहे. घबरदारी म्हणून सीमा भागात ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
पाकिस्ताननं जम्मू काश्मीर तसंच राजस्थानमध्ये ड्रोन हल्ला केला आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू आणि कुपवाडा तसंच राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला. पण, भारतीय सुरक्षा दलानं हा हल्ला निष्फळ ठरवला. या हल्ल्यानंतर जम्मू, कुपवाडा तसंच जैसलमेरमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world