Pune News: पुण्यातील अलिशान फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी, 156 जण ताब्यात, 49 तरुणींचा समावेश, कोण होता आयोजक?

लोणीकंद पोलिसांनी आज (7 जून) पहाटे 2.30 वाजता बंगल्यावर छापा टाकला आणि 156 जणांना ताब्यात घेतलं. ज्यामध्ये 107 पुरुष आणि 49 तरुणींचा समावेश होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Tulapur Rave Party News
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Rave Party News : पुण्यातील तुळापूर परिसरातील एका आलिशान फार्महाऊसवर सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर लोणीकंद पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. तुळापूर रोडवरील एका फार्महाऊसवर 6 ते 7 जून दरम्यान "प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी"नावाने रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या पार्टीमध्ये परवानगीच्या वेळेचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच पुणे पोलिसांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही तपासात समोर आले आहे. लोणीकंद पोलिसांनी आज (7 जून) पहाटे 2.30 वाजता बंगल्यावर छापा टाकला आणि 156 जणांना ताब्यात घेतलं. ज्यामध्ये 107 पुरुष आणि 49 तरुणींचा समावेश होता.

या रेव्ह पार्टीत 107 पुरुष आणि 49 तरुणींचा समावेश

लोणीकंद पोलीसांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने पुण्यातील आळंदी-मार्कल रोडवरील एका बंगल्यात सुरू असलेल्या 'प्रोजेक्ट एक्स'नावाच्या एका हाय-प्रोफाईल पार्टीवर छापा टाकला.ही लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात सुरू होती. पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर 15 अधिकारी आणि 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने आज (7 जून) पहाटे 2.30 वाजता बंगल्यावर छापा टाकला आणि 156 जणांना ताब्यात घेतलं.ज्यामध्ये 107 पुरुष आणि 49 तरुणींचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे यापैकी तीन जण 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या.तपासात असेही उघड झाले की,कार्यक्रमासाठी दिलेला दारू विक्रीचा परवाना फक्त शनिवारी (6 जून)रात्री 11.30 पर्यंतच वैध होता. मात्र त्यानंतरही पार्टी सुरू होती.

Advertisement

नक्की वाचा >> Mumbai News: मुंबई विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्याला अटक, रवींद्र चव्हाण यांच्यासोबतचा 'तो' फोटोही आला समोर

85 लाख किमतीचे साहित्य जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,घटनास्थळावरून अंदाजे 3 ग्रॅम गांजा,तीन कप पॉटमध्ये ठेवलेले 10 प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स आणि अंदाजे 9,22,000 किमतीचा दारु साठा जप्त करण्यात आला आहे.तसेच या कारवाईत एकूण 85 लाख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले असून अमली पदार्थांच्या वापराशी संबंधित काही साहित्य तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.महत्त्वाचे म्हणजे तपासात आयमान शेख (ब्लेझ एंटरटेनमेंट) आणि यश चौधरी (स्टार लाईट एंटरटेनमेंट)हे या रेव्ह पार्टीचे मुख्य आयोजक असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे त्या दोघांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे.तसेच या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

नक्की वाचा >> Pune News: जेजुरी जवळ असणाऱ्या 'त्या' टोल नाक्यावर 7 गावांतील ग्रामस्थ एकवटले, अवघ्या पुरंदरमध्ये चर्चेला उधाण

पोलिसांच्या कारवाई दरम्यान पार्टीमध्ये गांजासदृश अमली पदार्थ बाळगल्याचे,तसेच प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आणि हुक्का पॉटची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी अल्पवयीन मुलाकडून काम करून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात बंगला मालक नरेंद्र चूघ यांच्यासह आयोजक आईमन शेख आणि यश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याशिवाय पार्टीत सहभागी झालेले लोक तसेच बाउन्सर,बार टेंडर,हाऊसकीपिंग आणि इतर व्यवस्थापनाची कामे करणाऱ्या व्यक्तींनाही आरोपी करण्यात आले आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम,एनडीपीएस कायदा,बालकामगार प्रतिबंधक कायदा आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.