देवा राखुंडे, प्रतिनिधी
Purandar Belsar Toll Naka News : पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीक असणाऱ्या बेलसर टोल नाक्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. स्थानिक भूमिपूत्रांना संपूर्ण टोल माफी मिळावी, या मागणीसाठी सात गावांतील ग्रामस्थांनी टोलनाका प्रशासनाला लेखी निवेदन दिलं आहे. शिवरी,खळद,वाळुंज,बेलसर,तक्रारवाडी,साकुर्डे या सात गावातील ग्रामस्थांच्यावतीने टोल नाका प्रशासनाला हे निवेदन देण्यात आलेल आहे.
स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे म्हणाले की, शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना विविध कामांसाठी या मार्गावरून वारंवार प्रवास करावा लागतो.त्यामुळे टोल शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असून स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.वाळुंज गावचे माजी सरपंच कैलास बापू इंगळे यांनीही या मागणीला पाठिंबा देत स्थानिक नागरिकांना न्याय मिळावा,असे मत व्यक्त केले.
नक्की वाचा >> Mumbai News: मुंबई विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्याला अटक, रवींद्र चव्हाण यांच्यासोबतचा 'तो' फोटोही आला समोर
टोलमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत
या आंदोलनात कैलास कामथे,शिवरी गावचे प्रशासकीय सरपंच प्रमोद जगताप,पोपट खेंगरे,दादा थोपटे,नवनाथ कामथे,समीर कामथे यांच्यासह सातही गावांतील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्थानिकांच्या या मागणीमुळे टोलमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा >> Baramati News: दिवे घाटात सुपा पोलीस अन् आरोपींमध्ये रंगला फिल्मी थरार,अपहरण झालेला ऋषिकेश चांदगुडे सापडला का?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world