सुजित आंबेकर, प्रतिनिधी
साताऱ्यातील रिल्ससाठी चर्चेत असलेल्या महिलेचा खरा चेहरा समोर आला आहे. ही महिला जिल्ह्यात रिल्स स्टार म्हणून ओखळली जाते. मात्र पोलिसांच्या तपासात तिचं किळसवाणं कृत्य उघड झालं आहे. अखेर रिल्स स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिलेला अटक करण्यात आली आहे. साताऱ्यातील या रिल्स स्टारवर देहविक्रय व्यवसायात दोन महिलांना प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सातारा पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात रिल्स स्टार महिलेसह गणेश मनोहर भोसले (रा.कोरेगाव), ईश्वर सुभाष जाधव (रा. विलासपूर, सातारा), वीरेंद्र महेंद्र जाधव (रा.सदरबझार, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - बीड जिल्हा हादरला! 24 तासात दोघांचं अपहरण, तर एकाची हत्या!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनगावच्या हद्दीतील खिंडवाडी ते सोनगावात जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर मानवी अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा मारला असता संशयित टोळी दिसली. ते संगनमत करून दोन महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता संशयितांकडून रोख रकमेसह मोबाइल फोन, दोन दुचाकी असा 2 लाख 27 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देहविक्रय व्यवसायात महिला पुरविण्यासाठी महिलांचा व्यापार केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकामार्फत संबंधित टोळीतील महिलेला फोन लावला. वेश्या व पैशांबाबत बोलणं झाल्यानंतर त्यासाठी सोनगाव रस्त्यावर पार्टीला बोलावलं. त्यानुसार दुचाकीवरून सर्व संशयित देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत पोहोचले. यावेळी पोलिसांनी सर्वांना रंगेहाथ पकडलं. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर पाटील, फौजदार श्वेता पाटील, पोलिस मोना निकम, पंकजा जाधव, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, क्रांती निकम यांनी केली.