निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा सावत्र मुलावर भयंकर आरोप, वाचून बसेल धक्का

निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीनं सावत्र मुलगा आणि त्याच्या मित्रानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

नात्यांना काळिमा फासणारी एक घटना उघड झाली आहे.  निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीनं सावत्र मुलगा आणि त्याच्या मित्रानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केलाय. जम्मू काश्मीरमधील त्यांच्या घरामध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 

पीडित महिला वयाच्या चाळीशीमध्ये आहे. या महिलेनं नवऱ्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही केला आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील ही महिला असून तिच्या तक्रारीनंतर येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'आपल्याला घरामध्ये डांबून ठेवलं होतं. तसंच या प्रकरणात नवरा आणि सावत्र मुलाच्या विरोधात कोणतीही तक्रार करणार नाही, हे लेखी दिल्यानंतरच सूटका करण्यात आली', असा दावा या महिलेनं केलाय. पीडित महिला अनाथ असून जम्मू काश्मीर केडरमधील IAS अधिकाऱ्याशी तिचं 2020 साली लग्न झालं आहे. 

या महिलेनं नवऱ्याची पहिली पत्नी, तिचा मुलगा, मुलगी तसंच अन्य कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार केली आहे. 

ट्रेंडींग बातमी : बाप-बेटे चालत आले आणि सरळ रेल्वेखाली झोपले! भाईंदरमधील काळजाचा थरकाप उडवणारा Video )
 

'गेली काही वर्ष माझी सातत्यानं छळवणूक सुरु आहे. मला 11 ते 14 जुलैच्या दरम्यान एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. त्यांनी मला उपाशीही ठेवले. माझ्या नवऱ्याच्या मुलानं माझा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी माझ्यावर बलात्कार केला. बरीच विनवणी केल्यानंतर त्यांनी माझी सुटका केली,' अशी व्यथा या महिलेनं तक्रारीमध्ये मांडली आहे. 

आपल्याला एका तरुणाने लखनौमध्ये सोडले. या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी त्यानं दिली होती, असंही या महिलेनं सांगितलं. लखनौमध्ये आल्यानंतर या महिलेनं पोलिसांकडं तक्रार केली. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Topics mentioned in this article