जाहिरात
Story ProgressBack

बाप-बेटे चालत आले आणि सरळ रेल्वेखाली झोपले! भाईंदरमधील काळजाचा थरकाप उडवणारा Video

भाईंदर रेल्वे स्टेशनमध्ये पित्रा-पुत्रानं रेल्वे खाली येऊन जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचं CCTV फुटेज 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.

Read Time: 1 min
बाप-बेटे चालत आले आणि सरळ रेल्वेखाली झोपले! भाईंदरमधील काळजाचा थरकाप उडवणारा Video
भाईंदर:

मनोज सातवी, प्रतिनिधी

भाईंदर रेल्वे स्टेशनमध्ये पित्रा-पुत्रानं रेल्वे खाली येऊन जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचं CCTV फुटेज 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे. भाईंदर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर हा प्रकार घडला. हरिश मेहता आणि जय मेहता अशी आत्महत्या करणाऱ्या पिता-पुत्रांची नावं आहेत. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

विचलित करणारा व्हिडिओ 

विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन खाली उडी मारुन केली आत्महत्या केली. हे दोघंही विरारमधील रहिवाशी असल्याची माहिती आहे. आत्महत्येचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही विचलित होऊ शकता. आत्महत्या करण्यापूर्वी पिता पुत्र दोघेही सामान्यपणे चालत गेले. त्या घटनेच्या काही क्षण मुलगा बाजूला जात होता. पण, वडिलांनी त्याला ट्रेन खाली नेले. 

विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येत असलेल्या ट्रेन खाली त्यांनी जीव दिला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजलेलं नाही. वसई जीआरपीने या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे. 

( नक्की वाचा : BMW Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक )
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
पिता-पुत्राने रेल्वेखाली उडी घेत संपवलं जीवन; भाईंदरमधील मन सून्न करणारी घटना
बाप-बेटे चालत आले आणि सरळ रेल्वेखाली झोपले! भाईंदरमधील काळजाचा थरकाप उडवणारा Video
mumbai-bmw-crash-your-ladli behna-has-died-says victim pradeep-nakhwa-to-cm-eknath-shinde
Next Article
'तुमच्या लाडक्या बहिणीचा मृत्यू झालाय', BMW हिट अँड रन प्रकरणातील पीडित पतीचा टाहो
;