रशियाच्या दागिस्तान भागात दोन दहशतवादी हल्ले झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रशियाच्या डेरबेंट आणि मखाचकालामध्ये हे हल्ले झाले आहेत. डरबेंटमध्ये एका चर्चवर यहूदी आराधनागृहात हल्लेनंतर आग लागल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत चर्चच्या पादरींचाही मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यात 12 जणं जखमी झाले आहेत. याशिवाय 15 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचंही माहिती समोर आली आहे.
CNN च्या वृत्तानुसार, हा हल्ला दहशतवाद्यांनी केला असून याचा तपास सुरू आहे. डेरबेंट आणि माखाचकाला शहरात चर्च, आराधनालयं आणि पोलीस ट्रॅफिक स्टॉपवर हल्ल्यांचं वृत्त आहे. ही दोन्ही शहरं 120 किलोमीटर अंतरावर आहेत. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. रशियाच्या वृत्त संस्थेनुसार या दहशतवादी हल्ल्याच चार दहशतवाद्यांना ठार करण्यात रशियाच्या लष्कराला यश आलं आहे. त्याशिवाय फादर निकोले यांची डरबेंटच्या चर्चमध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली. ते 66 वर्षांचे होते आणि आजारी होते.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world