- रशियातील याकुत्स्क हे जगातील सर्वात थंड शहर असून येथे तापमान उणे 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाते
- याकुत्स्कची लोकसंख्या तीन लाखांहून जास्त असून हे पूर्व सायबेरीतील साखा प्रांताचे मुख्यालय आहे
- हिवाळ्यात बर्फाची जास्तीत जास्त खोली २५ फूटांपर्यंत पोहोचते आणि तापमान कधीकधी उणे ६० अंशांपर्यंत घसरते
तुम्ही मराठवाड्यात असाल किंवा विदर्भात. सध्या थंडीनं माणसं गारठत आहेत. थंडी कधी जाईल असं झालं आहे. तरीही विदर्भ-मराठवाड्यातलं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपासच आहे. तरीही ही स्थिती. तुम्ही कल्पना करा, जर हेच तापमान उणे- 50 कडे गेलं तर काय होईल? होय, जगात असही एक ठिकाण आहे जिथं ग्लासमधून पाणी फेकलं तर जमीनवर पाणी नाही तर काही सेकंदात बर्फ होतो. हे ठिकाणी दुसरं तिसरं कुठे नसुर रशियातील याकुत्स्क आहे. इथं तापमान उणे-45 असतं. जगातलं सर्वात थंड शहर म्हणून या शहराची ओळख आहे.
उणे-45 तापमान
या शहरात आणि अजूबाजूच्या परिसरात जिकडे बघाल तिकडे बर्फ असतो. इतकच काय तर माणसांच्या डोळ्याच्या पापण्याही बर्फानं गारठलेल्या असतात. बाजारात गेलात तर मासे वगैरेही उघडे असूनही गोठलेले. फ्रोजन फुड द्या असं म्हणण्याची गरजच नाही. कारण प्रत्येक गोष्ट इथली गोठलेली असते अगदी माणसांसहीत. पापण्यांवर बर्फ तर आहेच पण पुरुषांची दाडीही त्यातून सुटलेली नाही. तुम्ही गरम केलेलं पाणी आकाशात फेकलं तर खाली येईपर्यंत त्याचा बर्फ होतो. हे आहे जगातलं सर्वात थंड हवेचं ठिकाण. नाव आहे याकुत्स्क. देश रशिया. पूर्व सायबेरीत हे शहर वसलेलं आहे. आजच्या दिवशी याकुत्सकचं तापमान आहे उणे 45 आहे. आजच्या घडीला तरी जगात असं दुसरं ठिकाण नाही, शहर नाही. याकुत्स्क हे एकमेव आहे.
25 फुटांपर्यंत बर्फ
बरं असही नाही की याकुत्स्क काही लहानसं शहर आहे. याची लोकसंख्या हजारात नाही तर लाखात आहे. जवळपास तीन लाख लोकसंख्येचं हे शहर आहे. हे शहर 1632 मध्ये वसलं आणि 1643 मध्ये त्याला शहराचा दर्जा मिळाला. हे शहर रशियन प्रांत साखामध्ये वसलेलं आहे. त्याच प्रांताच्या राजधानीचं हे शहर आहे. सायबेरीयाचं नाव तुम्ही ऐकलेलं असेलच. त्याच सायबेरीयाच्या पूर्वेला याकुत्सक वसलेलं आहे. इथं व्यापार उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे तीन महिने कडाक्याच्या थंडीचे असतात. बर्फ एक नाही दोन नाही तर 25 फुटांपर्यंत जमा होतो. असं असतानाही कुठेही ट्राफिक जाम होत नाही, आपल्याकडे धुक्यात धडकतात तशा गाड्या एकमेकांवर धडकत नाहीत. सगळं काही सुरळीत, नॉर्मल सुरु असतं.
प्रचंड थंडी तरी ही...
याकुत्स्कमधल्या थंडीत बाहेरचे लोक टिकण्याची शक्यता कमीच. त्यामुळे कदाचित उंचच उंच इमारती असल्या. व्यापार उद्योगही मोठा असला. शहरही जुनं असलं तरीसुद्धा लोकसंख्या मात्र तीनच लाख आहे. तशीही रशियात लोकसंख्येची घनता कमीच आहे. त्यातही सायबेरीयन शहरं आणखी कमी. लोक उलनची, फरची कपडे घालून स्वत:चा मरणाच्या थंडीतून स्वताचा बचाव करतात. घरेही उबदार ठेवली जातात. विशेष म्हणजे इथलं मृत्यूदरही कमीच आहे. जे काही मृत्यू याकुत्सकमध्ये होतात ते श्वसनाशीच संबंधीत आहे. पण तेही नॉर्मल मानली जातात.
नक्की वाचा - Lionel messi: 100 कोटींचं जेट, 100 कोटींचं घर!, लियोनेल मेस्सीची एकूण संपत्ती किती?
कधी तापमान 60 च्या खाली
याकुत्स्कचं तापमान आहे कधी कधी उणे साठीच्या खाली घसरतं. दोन वर्षापूर्वी म्हणजे 2023 मध्ये इथं तापमान उणे 62 वर गेलं होतं. विशेष म्हणजे याकुत्स्कची आणखी एक खासियत आहे. इथलं तापमान थंडीच्या दिवसात उणे 60 डिग्रीपर्यंत घसरतं आणि गर्मीच्या दिवसात 30 डिग्रीपर्यंत असतं. म्हणजे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या तापमानात 90 डिग्री सेल्सिअसचं अंतर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याकुत्स्क हे जगातल्या प्रमुख हिरे उत्पादक शहरांमध्ये मोडतं. बर्फामुळे इथं शेकडो वर्षापूर्वीची मृतदेह कधी कधी जशास तशी मिळतात.
याकुत्स्कमध्ये उन्हाळ्यात पावसाळा
याकुस्कमधून याना नदी वहाते. इथला हिवाळा थंड तर असतोच पण दिर्घही असतो. आतापर्यंत याकुत्स्कमध्ये 10 नोव्हेंबर ते 14 मार्च दरम्यान तापमान कायम उणेच राहिलेलं आहे. कधीही अधिक तापमानाची नोंद झालेली नाही. याकुत्स्कमध्ये आतापर्यंतचं सर्वाधिक नोंदवलेलं तापमान आहे 38 अंश सेल्सिअस. साल होतं 2011. याकुत्स्कमध्ये एवढी थंडी का असा प्रश्न तरीही राहतोच. तर त्याला कारण आहे याकुत्स्कचं भौगोलिक स्थान. उच्च अक्षांशमध्ये याकुत्स्क येतं आणि त्यामुळे इथं भीषण थंडी पडते आणि वातावरणात अजिबात बदल जाणवत नाही. विशेष म्हणजे याकुत्स्कमध्ये पाऊस हा हिवाळ्यात नाही तर गरमीच्या दिवसात पडतो. पण पाऊसही तुरळकच पडतो. थर्टी फर्स्टला हिमाचल, काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल तर त्यापेक्षा याकुत्स्कला जायला काय हरकत आहे. कधी कधी काही एक्स्ट्रीम अनुभवण्याची मजा जगावेगळी असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world