Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी? पोलिसांच्या पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती समोर

सैफ अली खान हल्ला प्रकरणात ठाण्यातून अटक केलेल्या हल्लेखोराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सैफ अली खान हल्ला प्रकरणात (Saif Ali Khan Attacker) ठाण्यातून अटक केलेल्या हल्लेखोराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबत मोठे खुलासे केले आहेत. सध्या अटक केलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद शरीफूल इस्लाम शेहजाद असून 30 वर्षांचा आहे. हा आरोपी चोरीच्या हेतूने त्या घरात शिरला होता. त्यावेळी सैफ अली खान आणि आरोपीसोबत झालेल्या झटापटीत हा प्रकार घडला. त्याला आज कोर्टात सादर केलं जाणार आहे. त्यानंतर पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल. यानंतर आरोपीची चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

हा आरोपी मूळचा बांगलादेशी (Saif Ali Khan attacked Bangladeshi) असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीकडे भारतीय असल्याचा वैध पुरावा नाही. त्याच्याकडे आढळलेल्या काही साहित्यानुसार तो बांगलादेशी असल्याचं दिसतंय. पहिल्यांदाच तो सैफ अली खानच्या घरात गेल्याची शक्यता आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो भारतात आला होता.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Saif Ali Khan Attacked : सैफ प्रकरणात मोठी अपडेट, अखेर हल्लेखोराला ठाण्यातून अटक; गुन्ह्याचीही कबुली

भारतात आल्यानंतर तो विजय दास असं खोटं नाव सांगत होता. काही दिवसांपूर्वी तो मुंबईच्या जवळपासच्या भागात राहत होता. 15 दिवसांपूर्वी तो पुन्हा मुंबईत आला होता. आरोपी हाऊसकिपिंग एजन्सीमध्ये काम करीत होता. पोलिसांची चौकशी आणि त्याच्याकडे मिळालेल्या साहित्यानुसार, तो बांग्लादेशी असल्याचा संशय आहे. सदर आरोपीला ठाण्यातून अटक केली असून त्याच्यावर याआधी कोणताच गुन्ह्याची नोंद नाही.

Advertisement