Sangli News : सरकारी नोकरीसाठी 40 लाख रुपये भरले; मग कळले, 'तो' आदेश बनावट! मंत्र्याच्या नावानं मोठा फ्रॉड?

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक मोठी फसवणुकीची घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sangli News : या फसवणुकीसाठी एका बड्या मंत्र्याच्या नावाचा वापर करण्यात आलाय.
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक मोठी फसवणुकीची घटना समोर आली आहे. येथील महसूल विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन तरुणांना 40 लाख रुपये गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या फसवणुकीसाठी एका बड्या मंत्र्याच्या नावाचा वापर केल्याचे उघड झाले आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  पंढरपूर तालुक्यातील रणजित कुंभार नावाच्या व्यक्तीविरोधात जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणजित कुंभार याने आपण महसूलमंत्र्यांच्या कार्यालयात नोकरीला असल्याचे भासवले आणि मंत्रालयात क्लार्क पदावर शासकीय नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून खिलारे कुटुंबीयांसह इतर तरुणांची फसवणूक केली. त्याने निवडीचे बनावट आदेशही दाखवले होते. ही फसवणूक ऑगस्ट 2023 ते ऑगस्ट 2025 या दोन वर्षांच्या कालावधीत घडली आहे.


( नक्की वाचा : Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंढे यांच्यावर थेट निलंबनाची तलवार; भाजपा आमदारांचा 'धमकी'चा आरोप, विधानसभेत खळबळ )

या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. ज्या खिलारे कुटुंबीयांनी फिर्याद दिली आहे, त्यांच्या तक्रारीनुसार रणजित कुंभार याने थेट एका मंत्र्याचे नाव वापरले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे, फसवणुकीची व्याप्ती केवळ 40 लाख रुपयांपर्यंत नसून, त्याने तालुक्यातील अनेक युवकांना नोकरी लावण्याचे आणि मद्यविक्रीचा परवाना काढून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

( नक्की वाचा : Nagpur News : नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! पुण्यातील गंभीर प्रकरणात महिलेचा टोकाचा प्रयत्न,प्रकरण काय? )

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, आणखी काही तरुणांनी जत पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये आणखी 6 जणांचे पैसे रणजित कुंभार याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. जत पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि फसवणुकीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article