कानाखाली लगावली, बदला म्हणून 5 अल्पवयीन मुलांनी केलं भयंकर कृत्य, तुम्ही ही थक्क व्हाल

एका तरूणाने एका अल्पवयीन तरूणाच्या कानाखाली मारणं निमित्त झालं. कानाखाली मारल्याचा बदला काय असू शकतो याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

कोणत्या व्यक्तीला कसला राग येईल हे सांगता येत नाही. त्यातून तो किती टोकाचं पाऊल उचलू शकतो याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अशी एक सर्वांना हादरवून सोडणारी घटना सांगलीमध्ये घडली आहे. या घटनेने सर्वच जण आवाक झाले आहेत. इथं एका तरूणाने एका अल्पवयीन तरूणाच्या कानाखाली मारणं निमित्त झालं. कानाखाली मारल्याचा बदला काय असू शकतो याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. त्याही पेक्षा धक्कादायक म्हणजे हे टोकाचं कृत्य करणारे सर्व अल्पवयीन आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सांगली शहरामध्ये एका कबड्डीपट्टू तरुणाला कल्पानाही नसेल की एखाद्याच्या कानाखाली मारणे आपल्या जीवावर बेतेल. अनिकेत हिप्परकर हा तरूण कबड्डीपटू आहे. हनुमान जयंतीच्या वेळी अनिकेतने एका अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावली होती. त्याचा राग त्या अल्पवयीन तरूणाच्या मनात होता. याचा काही झाला तरी बदला घ्यायचा असं त्याने ठरवलं होतं. त्यातून त्याने धारधार शस्त्राने अनिकेतवर सपासप वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?

शहरातल्या जामवाडी या ठिकाणी धारदार शस्त्रांनी वार करत अनिकेत याची ही हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अनिकेत हा व्यायाम करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. त्याच्या मागावर असणाऱ्या हे पाच अल्ववयीन हल्लेखोरांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या मरगूबाई मंदिराजवळ होते. तिथे त्यांना अनिकेतला गाठून त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला.  

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

यामध्ये अनिकेत याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळतात सांगली शहर पोलिसांसह पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर  पंचनामा केला गेला. त्याचबरोबर हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके देखील रवाना करण्यात आली. मात्र हत्येच्या घटनेने सांगली शहर हादरून  गेले आहे. छोट्याश्या कारणामुळे ऐवढा मोठा कांड झाला. यामुळे सर्वच जण आवाक झाले आहेत. 

Advertisement