शरद सातपुते, सांगली:
Sangli Crime: चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटे टांगल्याची भयंकर घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. नराधम बापाच्या या कृत्याने एका मुलीला जीव गमवावा लागला असून दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरुन गेला आहे. पोलिसांनी पित्याला अटक केली असून अधिक तपास सध्या सुरु आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोरी केल्याच्या संशयातून एका बापाने आपल्या दोन्ही मुलींना उलट सांगून ठेवल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आटपाडी तालुक्याच्या बनपुरी मध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे.या प्रकरणी निर्दयी दादू यमगर या बापाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
यमगर यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने दोन्ही मुलींच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला, त्यानंतर संतापलेल्या दादू यमगर यांनी आपल्या दहा व तेरा वर्षीय अनुजा व सारिका या दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलट टांगून ठेवलं, ज्यामध्ये सारिका यमगारीचा तडफडून मृत्यू झाला आहे, तर अनुजा किती प्रकृती गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा तक्रार झाली नसल्याचं पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितले आहे. मात्र या घटनेने आटपाडी तालुका सुन्न झाला आहे.