लाडक्या बहिणीचे एकाच वेळी 28 अर्ज, सरकारला गंडा घालण्याचा डाव 'असा' झाला पर्दाफाश

या योजनेच्या माध्यमातून सरकारलाच गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात एका महिलेने आपल्या नावे एक दोन नाही तर तब्बल 28 अर्ज केले होते.

Advertisement
Read Time: 3 mins
सातारा:

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यात आले आहे. त्याला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दिड हजार रूपये महिन्याला दिले जात आहेत. याचा लाभ अनेक महिलांनीही घेतला आहे. मात्र या योजनेच्या माध्यमातून सरकारलाच गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात एका महिलेने आपल्या नावे एक दोन नाही तर तब्बल 28 अर्ज केले होते. त्यासाठी वेगवेगळी बनवट आधारकार्डचा वापर तिने केला होता. सातारा जिल्ह्यातील खटावमध्ये हा प्रकार समोर आला आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ladakibahin.maharashtra.gov.in या नवीन पोर्टलवर प्रतीक्षा पोपट  जाधव या महिलेच्या नावाने तब्बल 28 अर्ज असल्याचे दिसून आले. ही महिला 22 वर्षाची आहे. हीने आपल्या नावाने वेगवेगळ्या आधार कार्डचा  वापर करुन अर्ज भरले होते. पोर्टलवर या महिलेच्या नावाने एका पेक्षा जास्त अर्ज असल्याचे छाननीमध्ये लक्षात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. त्यांनी या बाबत पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर या तरूणीसह तिच्या पतीलाही पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलेच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार

या घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा प्रशासनाने  त्रि सदस्य समिती स्थानक केली होती. या समितीला छाननी मध्ये 28 अर्ज एकाच नावाचे दिसून आले आहेत. अर्जामध्ये एकच नाव आहे. तर सर्व कागदपत्रे त्याला जोडण्यात आली आहेत. तर आधार कार्ड मात्र बनावट असल्याचे यात समोर आले आहे. अर्ज भरतेवेळी वेगवेगळ्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करण्यात आलेला आहे. छाननी वेळी हीबाब समोर आली आहे. याघटनेनं जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. त्यांनीही आता खबरदारी घेतली आहे.   

ट्रेंडिंग बातमी - आरोग्य मंत्र्यांसाठी परांड्याची वाट बिकट? करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार?

प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेने ऑनलाईन अर्जासोबत माणदेशी महिला सहकारी बँकेची माहिती दिली आहे. या एकच बँक खात्याची माहिती तिने सर्व अर्जात दिली आहे. या खात्यात तीन हजार जमा झाल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र इतर आधार कार्ड हे बनावट असल्याने त्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. गुगलवर तिने आधार नंबर मिळवून हा बनाव केला होता. त्यानंतर तिने अर्ज भरले. सरकारला गंडा घालण्याच्या या कामात तिला तिच्या पतीने मदत केल्याचेही समोर आले आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मालेगावमध्ये चड्डी बनियान गँगचा पुन्हा धुमाकूळ, दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

दरम्यान प्रशासनाच्यावतीने संबंधित आधारकार्ड क्रमांक यांच्याशी संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील घेण्याची कारवाई करण्यात येत आहे. या योजनेत सर्वोच्च स्तरावरील छाननीचे पालन केले जात असून संबंधित महिलेच्या खात्यात केवळ तीन हजार रुपये जमा झाले आहेत. सदर योजनेचे दररोज परीक्षण होत असून केवळ आधार सीडेड खाते क्रमांक असलेल्या लाभार्थ्यालाच या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच एका लाभार्थ्याला एकाच वेळी लाभ मिळेल हे छाननी वेळी सुनिश्चित केले जात असल्याचे ही सातारा जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Advertisement