Satara Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्येमध्ये एक नवं पत्र उघड, खासदार आणि PA चा ही पत्रात उल्लेख

Satara Doctor Case: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या मूळच्या बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टरने लिहिलेले एक सनसनाटी पत्र NDTV मराठीच्या हाती लागले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Satara Doctor Case: चार पानी असलेल्या या पत्रातून डॉक्टर तरुणीने अनेक धक्कादायक आणि गंभीर खुलासे केले आहेत.
मुंबई:

Satara Doctor Case: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या मूळच्या बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले एक सनसनाटी पत्र NDTV मराठीच्या हाती लागले आहे. चार पानी असलेल्या या पत्रातून डॉक्टर तरुणीने अनेक धक्कादायक आणि गंभीर खुलासे केले असून, तिच्या आत्महत्येमागे छळवणुकीची गंभीर कारणे असल्याचे उघड झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिला डॉक्टरने आपल्यावर आलेल्या संकटांचा आणि छळाचा खुलासा करणारे एक चार पानी पत्र लिहिले आहे. तसेच, तिने आपल्या हातावर सुसाईड नोट (Suicide Note) देखील लिहिली होती. या चिठ्ठीत तिने थेट दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. हे संपूर्ण पत्र 'NDTV मराठी' च्या हाती लांगलंय. 

पत्रातून धक्कादायक खुलासा

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या पत्रात संबंधित महिला डॉक्टरने तिच्यावर आलेली आपबिती सविस्तरपणे मांडली आहे. या पत्रातील महत्त्वाचे आणि गंभीर मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

दुय्यम वागणूक: ही महिला डॉक्टर बीड (Beed) जिल्ह्याची रहिवासी असल्याने तिला रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात सातत्याने दुय्यम वागणूक (Secondary Treatment) मिळत होती, असा स्पष्ट उल्लेख पत्रात आहे.

खासदार आणि पीएचा उल्लेख: सर्वात गंभीर बाब म्हणजे, या पत्रात एका खासदार (MP) आणि त्यांच्या पीएचा (PA) देखील उल्लेख करण्यात आला आहे.

Advertisement

पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट बदलण्याचा दबाव: एका खुनाच्या (Murder Case) प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट (Post-Mortem Report) बदलण्यासाठी या महिला डॉक्टरवर मोठा दबाव (Pressure) आणला जात होता, अशी बाबही या पत्रातून समोर आली आहे.

'बीड' कनेक्शनवरून आरोप: "बीडची असल्याने तू गुन्हेगारांबाबत टोचून बोलतेस," अशा प्रकारचे आरोपही तिच्यावर केले जात असल्याचा उल्लेखही तिने पत्रात केला आहे.

( नक्की वाचा : Shocking: समलैंगिक मित्राच्या मुलीबरोबरच्या कृत्याने बापाचा संताप अनावर; क्रूर सूड घेतला, पण अखेर स्वतः... )

हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा आरोप

आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर तरुणीने आपल्या हातावर एक सुसाईड नोट (Suicide Note) देखील लिहिली होती. या चिठ्ठीत तिने थेट दोन व्यक्तींचा उल्लेख करत त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या पत्रात  PSI गोपाल बदने याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार (Rape) केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.

Advertisement

धनंजय मुंडेंकडून SIT चौकशीची मागणी

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

"ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे," असे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र SIT (Special Investigation Team) नेमून चौकशी (Inquiry) करण्यात यावी, तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात (Fast-Track Court) चालवले जावे, अशी मागणी करत मुंडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहेत.
 

Topics mentioned in this article