जाहिरात

Satara News : अभिनेत्री पूजा सावंत हिच्या वाहनाला भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनला जाताना 3 गाड्यांची धडक!

साताऱ्यातील काशिळ गावाच्या हद्दीत पूजा सावंत तिच्या कारला अपघात झाल्याची माहिती आहे.

Satara News : अभिनेत्री पूजा सावंत हिच्या वाहनाला भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनला जाताना 3 गाड्यांची धडक!

राहुल तपासे, प्रतिनिधी

Actress Pooja Sawant's car accident  : मराठी अभिनेत्री पूजा सावंत हिच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील काशिळ गावाच्या हद्दीत तिच्या कारला अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सावंत ही कपबशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सांगली येथे निघाली होती. त्यादरम्यान साताऱ्यातील काशिळ गावाजवळ तिच्या कारला अपघात झाला. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती समोर आली आहे. 

या अपघातात पूजा सावंत हिच्या पाठीला मार लागल्याची माहिती आहे. कराड येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलं. सध्या पूजा हिची प्रकृती स्थिर असल्याचं तिच्या भावाकडून सांगितलं जात आहे. 

पूजा सावंत हिच्या पाठीला मार लागल्याची माहिती...
 

पूजा सावंत हिचा कपबशी नावाचा चित्रपट येत्या १९ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री पूजा सावंत सांगलीला निघाली होती. यावेळी तिच्यासोबत अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाच्या प्रसिद्ध प्रमुख दर्शन मुसळदेखील होते. यादरम्यान सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. यादरम्यान गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. याशिवाय पूजा सावंत हिच्या पाठीलाही मारला लागल्याचं सांगितलं जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com