Satara News: अल्पवयीन मुलाची धिंड! नाव ही जाहीर केलं, प्रकरण चिघळणार? नातेवाईकांच्या मागणीने टेन्शन वाढलं

त्या मुलाच्या पालकांनी सांगितलं की आमच्या मुलाची धिंड काढली गेली. आमचं नाव घालवलं गेलं. समाजात आमची बदनामी झाली.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • म्हसवड येथे पोलीसांनी अल्पवयीन मुलाची धिंड काढल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे
  • सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी बनावट गुन्हा दाखल करून चमकोगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे
  • अल्पवयीन मुलाची खोट्या आरोपांमुळे समाजात बदनामी झाली असून त्याचा कुठलाही गुन्हा नव्हता, असे कुटुंबीय सांगतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
सातारा:

राहुल तपासे 

म्हसवड येथे काही दिवसापूर्वी पोलीसांनी अल्पवयीन मुलाची धिंड काढली होती. या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी  तक्रारदार आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज साताऱ्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या वेळी पोलीस अधिक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या आश्वासनाने कुटुंबीयांचे समाधान झालेले नाही. त्यांनी पोलीसांवर गंभीर आरोप केले आहे. शिवाय पुढच्या काळात आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे. आमच्या मुलाला या प्रकरणात गुंतवल्याचा आरोप ही केला आहे. 

सहाय्यक पोलीस निरिक्षक अक्षय सोनावणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. नगपालिका निवडणुकी दरम्यान त्यांनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला. त्यांना चमकोगिरी करायची होती. त्यामुळे त्यांनी काही तरुणां विरोधात खोटा गुन्हा दाखल केला असं त्यांनी म्हटलं आहे. त्यात एक अल्पवयीन आरोपी होता. या मुलांची खतरनाक गँग आहे  असं सांगण्यात आलं. या आरोपींची बाजारपेठेतून धिंड ही काढण्यात आली. त्या वेळी त्या अल्पवयीन आरोपीचे नाव ही जाहीर करण्यात आलं. तो दोषी नसताना ही त्याची ओळख जाहीर करण्यात आली असा आरोपही कुटुंबीयांनी केली. त्यामुळे समाजात त्यांची बदनामी झाली. या प्रकरणी आता पोलीसांवरच गुन्हा दाखल झाला पाहीजे असं त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - 'भारताने माझा विश्वासघात केला' 37 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा देश सोडण्याचा निर्णय, थेट इराणला जाणार

त्या मुलाच्या पालकांनी सांगितलं की आमच्या मुलाची धिंड काढली गेली. आमचं नाव घालवलं गेलं. समाजात आमची बदनामी झाली. माझ्या मुलाने कुणाचा मुडदा पाडला होता का असा प्रश्न मुलाच्या आईने उपस्थित केला आहे. आता आयुष्यभर ही बदनामी सहन करावी लागणार आहे. त्याची काही चुक नव्हती. त्याच्या विरोधात कधी कोणताही गुन्हा नव्हता असं ही त्याच्या आईने सांगितलं. एफआयआरमध्ये एक सांगितलं गेलं आहे आणि माध्यमांना दुसरं सांगितलं गेलं ही तफावत मुलाच्या वडीलांनी दाखवून दिली आहे. तो एक खेळाडू होता. जिल्हा स्तारावर तो खेळला होता. त्याची राज्यपातळीवर निवड झाली होती अशी माहिती ही यावेळी त्या अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी दिली.  

नक्की वाचा - Maya Ivenate: भाजपच्या यादीत सरप्राईज नाव! उमेदवारी मिळालेल्या माया ईवनाते कोण? काय आहे राष्ट्रपतींशी कनेक्शन

दरम्यान कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट आरोपांच्या आधारे अल्पवयीन मुलांची धिंड काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणी अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संबंधितां विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. अन्यथा उद्यापासून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. या शिष्टमंडळात भागवत जानकर, विजया जानकर, सोनाली जानकर, महेश करचे, डॉ. प्रसाद ओंबासे, दादासो खुपकर, सचिन चव्हाण व भाऊसाहेब धुलगुडे यांचा समावेश होता. या प्रकरणाकडे आता जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article