Satara Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यामधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडालीय. पोलिसांनी शुक्रवारी (24 ऑक्टोबर 2025) दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरने त्यांच्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तिने केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरने त्यांच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये आरोप केलाय की मागील पाच महिन्यांत एका पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर अनेकदा बलात्कार केला, तर आणखी एक व्यक्ती मानसिक छळ करत होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दखल घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) तुषार दोशी यांच्याशी फोनद्वारे बातचित केली आणि सुसाइड नोटमध्ये ज्या पोलीस उपनिरीक्षकाचा उल्लेख केला होता, त्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
हॉटेलच्या रूममध्ये महिला डॉक्टरने घेतला गळफास | Woman Doctor Committed suicide | Satara News | Phaltan News
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय महिला डॉक्टर (Satara Doctor Suicide Case) फलटण तालुक्यामधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. गुरुवारी (23 ऑक्टोबर 2025) रात्री उशीरा फलटणमधील एका हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला"
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये लिहिलंय की पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं (Gopal Badane) त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला तर पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांत बनकरने (Prashant Bankar) तिचा मानसिक छळ केला. याप्रकरणी बदने आणि बनकरविरोधात बलात्कार तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं स्थापित : सातारा पोलीस अधीक्षक
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Satara Superintendent of Police (SP) Tushar Doshi) यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, फलटण शहर पोलीस ठाण्यात एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन जणांविरोधात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथकं स्थापित करण्यात आली आहेत. महिला डॉक्टरने फलटणच्या एसडीपीओकडे (उपविभागीय पोलीस अधिकारी) काही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार केल्याचीही माहिती पोलीस अक्षीक्षक दोशी यांनी दिली.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पुढे असंही सांगितलं की, "महिला डॉक्टरने (Satara Doctor Suicide Case) फलटणमधील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. त्यादरम्यान हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला आणि बेल वाजवली तेव्हा त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दुसऱ्या किल्लीने दरवाजा उघडला. त्यावेळेस महिला डॉक्टर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही दोन पथके तयार केली आहेत. महिला डॉक्टराचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आलाय. सुसाइड नोटमध्ये करण्यात आलेल्या आरोपांचीही आम्ही चौकशी करत आहोत".
कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) सुनील फुलारी यांनी सांगितले की, "आतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. सातारा जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलंय."
महिला डॉक्टरच्या नातेवाईकांचा केला मोठा दावा
महिला डॉक्टरच्या एका नातेवाईकाने दावा केलाय की, तिच्यावर पोस्टमॉर्टेम अहवालातील तथ्ये बदलण्यासाठी आणि काही प्रकरणांमध्ये अटक केलेल्या आरोपींच्या वैद्यकीय तपासणी अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता.
महिला डॉक्टरच्या एका नातेवाईकाने सांगितले की, "ती एक हुशार आणि महत्त्वाकांक्षी तरुणी होती. लहानपणापासूनच आम्ही तिच्या संगोपनाची आणि शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घेतली होती. कामाच्या ठिकाणी तिच्यावर दबाव होता, म्हणूनच तिने हे कठोर पाऊल उचलले. दोषींना शिक्षा झाली पाहिजे."
आणखी एका नातेवाईकाने दावा केला की, "दोन दिवसांपूर्वीच तिने आम्हाला सांगितले होते की कामाच्या ठिकाणी काही वरिष्ठ कर्मचारी तिला त्रास देत आहेत."
महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी केला या व्यक्तीला फोन | Satara Woman Doctor Had Called Accused Software Engineer Before Suicide: Probe
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरने (Satara Doctor Suicide Case) आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी प्रशांत बनकरला फोन केला होता, जो पुण्यात (Pune News) वास्तव्यास आहे आणि दोघांमध्ये मेसेजद्वारेही (चॅटिंग अॅप) संवाद झाला होता. या संदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय-भाषा वृत्तसंस्थेला माहिती दिली की, महिला डॉक्टर फलटणमध्ये प्रशांत बनकरच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर राहत होती.
(नक्की वाचा: Satara Doctor Case : 'तो' खासदार कोण? मानसिक छळानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या; वाचा संपूर्ण खळबळजनक पत्र)
https://t.co/Cgp2fJ7cf9 *"डॉक्टर असतानाही असह्य वेदनेने आत्महत्या, समाजातील ही सामूहिक अपयशाची वेळ - डॉ. नीलम गोऱ्हे"*
— Dr Neelam Latika Diwakar Gorhe (@neelamgorhe) October 24, 2025
*फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी उपसभापतींची भुमिका*
सातारा, दि. २४ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या… pic.twitter.com/OXytinkLGT
(नक्की वाचा: Satara Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्येमध्ये एक नवं पत्र उघड, खासदार आणि PA चा ही पत्रात उल्लेख)
राज्य महिला आयोगाने घेतली दखल
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) October 24, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

