जाहिरात

EXCLUSIVE: प्रपोज, सहकुटुंब देवदर्शन, धक्कादायक LOVE अँगल? डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येत नवा ट्वीस्ट!

Phaltan Doctor Suicide Death Case: आई वडिलांनी मुलीप्रमाणे सांभाळ केला. त्या अगदी घरच्यांप्रमाणे त्यांच्याच घरी जेवायच्या, असं प्रशांत बनकर यांच्या बहिणीने सांगितले आहे. 

EXCLUSIVE: प्रपोज, सहकुटुंब देवदर्शन, धक्कादायक LOVE अँगल? डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येत नवा ट्वीस्ट!

Phaltan Doctor Suicide Death Case: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरुणीने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) एका पोलीस अधिकाऱ्यासोबतच इंजिनिअर प्रशांत बनकर (Prashant Bankar) या तरुणावर गंभीर होता. मात्र आता प्रशांत बनकरला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मात्र या प्रकरणाला वेगळे वळण देणारा खळबळजनक दावा केला आहे.

आरोपीच्या कुटुंबियांच्या दाव्याने खळबळ... 

प्रशांत बनकरच्या बहिणीने 'NDTV मराठी'ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी काही महत्त्वाचे दावे केले आहेत. पिडीत डॉक्टर तरुणी गेल्या वर्षभरापासून बनकर यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होत्या. बनकर यांची दोन्ही मुले बाहेर राहायची, त्यामुळे प्रशांतचे आई वडिलचं घरी असायचे. भाड्याने राहत असल्या तरी बनकर यांच्या कुटुंबियांशी त्यांचे कौटुंबिक संबंध तयार झाले होते. आई वडिलांनी मुलीप्रमाणे सांभाळ केला. त्या अगदी घरच्यांप्रमाणे त्यांच्याच घरी जेवायच्या, असं प्रशांत बनकर यांच्या बहिणीने सांगितले आहे. 

Satara Doctor Death: डॉक्टर तरुणीनेच प्रपोज केलं? प्रेमासाठी टॉर्चर.. फलटण आत्महत्या प्रकरणात खळबळजनक दावा

आरोपी प्रशांत बनकर हा आयटी इंजिनिअर असून तो पुण्यामध्ये काम करतो.  काही महिन्यांपूर्वी  प्रशांत बनकरला डेंगू आणि मलेरिया (Dengue-Malaria) झाला होता, तेव्हा त्याच्यावर डॉ. मुंडे यांनी उपचार (Treatment) केले, आणि त्यातून त्यांची ओळख झाली. स्वतः डॉक्टर तरुणीने प्रशांतचा नंबर घेतला होता. प्रशांत बनकर नोकरीसाठी पुण्यात (Pune) गेला असताना, डॉ. मुंडे यांनी त्याला फोन करून प्रेमसंबंधाचा प्रस्ताव (Proposal) ठेवला होता, पण प्रशांतने तो नाकारला होता, असे बहिणीने सांगितले.

सहकुटुंब देवदर्शन..

आता दिवाळीआधी डॉक्टर तरुणीचे कुटुंब त्यांना भेटायला आले होते,  त्यावेळी त्यांनी शिंगणापूर येथे देवदर्शनाठी जाऊ असे सांंगितले. आमची गाडी असल्याने सहकुटुंब देवाला गेलो. यानंतर फोटो  पाहताना त्या भावावर रागावल्या होत्या. माझा फोटो असाच का काढला? असे म्हणत त्या रागाने भावाशी बोलल्या असाही दावा प्रशांत बनकर याच्या बहिणीने केला आहे. 

प्रेमप्रकरणासाठी दबाव... 

प्रशांतने नकार दिल्यानंतरही डॉक्टर तरुणी वारंवार त्याला संपर्क करत होत्या. तो त्यांना इग्नोर करत होता.  प्रेमासाठी त्याला टॉर्चर करत होत्या. त्यांनी मत्यूपर्यंत केलेले सर्व मेसेजचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेले आहेत. १५ दिवसांपासून त्या टेन्शनमध्ये होत्या. जेवणही करत नव्हत्या. कोणत्याही प्रश्नाला वेगळेच उत्तर द्यायच्या. डॉक्टर महिला नेहमी आमच्या घरी यायच्या आणि जॉबमध्ये सुरू असलेल्या त्रासाबाबत (Job Stress) सांगायच्या. त्या खूप टेन्शनमध्ये असायच्या आणि त्यांना मानसिक त्रास सुरू असल्याचे स्पष्ट दिसत होते." असंही आरोपीच्या बहिणीने सांगितलं आहे. 

Phaltan Doctor Case: 5 महिन्यांपासून छळ, अखेर दुर्दैवी अंत! डॉक्टर तरुणीसोबत काय काय घडलं? A टू Z स्टोरी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com