Kalyan Crime News Today : कल्याणमधील आधारवाडी कारागृहासमोर अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेलमध्ये बंद असलेल्या एका आरोपीच्या समर्थकांनी जेलच्या गेटवरच फटाक्यांची आतिषबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.या घटनेमुळे जेलच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आधारवाडी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक तरुण येतो आणि तो फटाके लावतो. तसच तो मस्ती करत रोडच्या दिशेने धावत जातो. हा प्रकार शनिवारी रात्री घडल्याचं सांगितलं जात आहे.
सोशल मीडियावर लोकांनी टीकेची झोड उठवली
सतीश कांबळे उर्फ सत्या भाई नावाचा एक आरोपी जेलमध्ये बंद आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या समर्थकांनी ही फटाकेबाजी केल्याचे समजते.ज्या प्रकारे या सत्या भाईच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. ते पाहून सोशल मीडियावर लोकांनी टीकेची झोड उठवली आहे.
कल्याणमधील आधारवाडी कारागृहात मोठ्या प्रमाणात कुख्यात गुंड बंद आहेत.याआधी देखील जेलमधून बाहेर आल्यानंतर अनेक वेळा गुंड आणि भाई लोकांच्या समर्थकांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आले आहे.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याणमध्ये रात्री फिरताना अलर्ट राहा! 'या परिसरातील नागरिकांच्या घरांवर झाला सुतळी बॉम्ब हल्ला
या प्रकरणी जेल प्रशासनाच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत.तसच कारवाई देखील झाली आहे.तरीही आशा प्रकारच्या घटना कमी होताना दिसत नाही. सत्या भाईच्या समर्थकांविरोधात पोलिसांनी ठोस कारवाई केली पाहिजे ,अशी मागणी होत आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा आधारवाडी करागृहाच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता सत्या भाई कोण आहे? आणि त्याचे समर्थक कोण होते? ज्याने आतिषबाजी केली आहे, हे पोलीस तपासात समोर येणार आहे.