सैन्य भरतीत अपयशी, तरीही 'मेजर', बोगस भरतीचा मोठा झोल; 9 राज्यांतील तरुणांची फसवणूक

भरतीची प्रक्रिया जवळून पाहिल्याने त्याला यातून गैरमार्गाने पैसे कमावण्याचा मार्ग सुचला.

जाहिरात
Read Time: 2 mins
अहमदनगर:

उत्तराखंडमध्ये बोगस सैन्य भरतीचा भंडाफोड (bogus army recruitment) करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 28 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. सत्यजीत कांबळे असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा (Crime News) अहमदनगरचा आहे. कांबळे हा स्वत:ला मेजर असल्याचं भासवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. कांबळेने विविध राज्यांतील तरुणांना गंडा घातला असून त्याने प्रत्येक तरुणाकडून भरतीच्या नावाखाली 7-8 लाख रुपये उकळले असावेत असा अंदाज आहे. सत्यजीत याच्याविरोधात 26 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक झालेल्या एका तरुणाने पोलिसांत धाव घेत सत्यजीतविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सत्यजीत याने सैन्यात भरतीसाठी अनेकदा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्याला अपयश आले होते. भरतीची प्रक्रिया जवळून पाहिल्याने त्याला यातून गैरमार्गाने पैसे कमावण्याचा मार्ग सुचला होता. सत्यजीत याने 'मेजर' असल्याचे भासवत तरुणांना गंडा घालण्यास सुरुवात केली. त्याने उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील तरुणांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. सत्यजीतला इतरही काहींनी मदत केल्याचे पोलिसांना कळाले असून त्यांचा सध्या शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. 

नक्की वाचा - Cyber Crime : राज्यापुढे नवं संकट, नवी मुंबईतील त्या गुन्ह्याने खळबळ; नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन

    टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तामध्ये एका सैन्य दलाच्या अधिकाऱ्याने म्हटलं की, कांबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी डेहराडूनच्या मालदेवता भागात एक बोगस सैन्य भरती कॅम्प लावला होता. युद्धवीर ट्रेनिंग कॅम्प असे त्याला नाव देण्यात आले होते. एका शेतकऱ्याकडून त्याची शेतजमीन भाड्याने घेऊन हा कॅम्प लावला होता. कांबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी डेहराडूनच्याच एका दुकानातून सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांचे ड्रेस विकत घेतले होते.

    Advertisement