जाहिरात

Cyber Crime : राज्यापुढे नवं संकट, नवी मुंबईतील त्या गुन्ह्याने खळबळ; नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन

सायबर गुन्हेगार नोकरी, बँक संबंधित काम आणि नफ्यासह विविध ऑफर्सचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत आहे.

Cyber Crime : राज्यापुढे नवं संकट, नवी मुंबईतील त्या गुन्ह्याने खळबळ; नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

राज्यातच नाही तर देशभरामध्ये सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) धुमाकूळ घातला आहे. एकट्या नवी मुंबईमध्ये रोज दोन कोटी पेक्षा जास्त सायबर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. एका वर्षामध्ये 200 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. जवळपास 200 कोटी पेक्षा जास्त रक्कम सायबर चोरट्यांनी उडवली आहे.

दहशतवाद्याशी संबंधित असलेल्या बँक अकाउंटमध्ये मनी लाँडरिंगची रक्कम आल्याची भीती दाखवून एका सायबर टोळीने नवी मुंबईतील घणसोली भागात राहणाऱ्या व्यक्तीला त्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी दिली. तसेच, त्याच्याकडून 26 लाख 52 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. फसवणूक झालेली व्यक्ती घणसोली भागात राहते, 26 ऑगस्ट रोजी त्यांना सायबर टोळीने पोलीस अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधला होता. तसच त्यांनी व्हिडिओ कॉल करून पूर्ण पोलीस सेटअप दाखवला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्ंयावरती विश्वास ठेवला. त्यांच्या अकाउंटमध्ये मनी लाँडरिंगचे पैसे आल्याचे तसेच बँक अकाउंटचा याकूब मेनन या आतंकवाद्याशी संबंध असल्याची भीती दाखवली. तसेच, दुबई येथे कुरिअर करण्यात आले असून त्यात नऊ पोलीस युनिफॉर्म, 13 पोलीस ओळखपत्रे, 150 ग्रॅम केटामाईन, दोन डेबिट कार्ड असल्याची भीती दाखवून देशद्रोहाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्याची भीती दाखवली.

हे ही वाचा - Pune Hit and Run : पुण्यात आणखी एक हिट अँड रन; मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

सर्व प्रथम त्यांचे आधार कार्ड मागून घेतले व त्यावरून त्याचे ओटीपी व्हेरिफिकेशन करण्यात आले. सायबर टोळीने गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी तसेच मनी लाँड्रींग केलेली रक्कम क्लिअर करण्यासाठी आरबीआयकडे रक्कम भरावी लागेल, असे सांगून या व्यक्तीला वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाइन रक्कम पाठवण्यास भाग पाडले. घाबरलेल्या त्या व्यक्तीने वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल 25 लाख 52 हजार रुपये पाठवून दिले. मात्र त्यानंतर देखील टोळीकडून या व्यक्तीला आणखी पैसे पाठविण्यास सांगण्यात येऊ लागले. त्यानंतर फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नवी मुंबई नेरूळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा - गरिबीचा सौदा! बायको अन् नवजात बाळाला सोडवण्यासाठी त्यानं 2 वर्षांचा मुलाला विकलं 

    सायबर गुन्हेगारीच्या लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार नोकरी, बँक संबंधित काम आणि नफ्यासह विविध ऑफर्सचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत आहे. मात्र, नागरिकांनी अशाप्रकारच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये. असं नवी मुंबई सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी एनडीटीवीशी बोलताना सांगितले. नवी मुंबई सायबर गुन्ह्या संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी 8828 112 112 यावर संपर्क करावा. नवी मुंबईमध्ये सायबर गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सायबर पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे. या गुन्ह्याचा तपास नवी मुंबई सायबर पोलीस करीत आहे

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    Switch To Dark/Light Mode
    Previous Article
    नागपूरमध्ये ऑडी कारनं धुमाकूळ घालणारा संकेत बावनकुळे अडकणार? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
    Cyber Crime : राज्यापुढे नवं संकट, नवी मुंबईतील त्या गुन्ह्याने खळबळ; नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन
    ambernath-morivali-midc-chemical-plant-gas-leak
    Next Article
    अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत गॅस गळती