देहराडूनच्या विशेष पॉस्को कोर्टाने मंगळवारी एका 30 वर्षांच्या महिलेला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावणी आहे. याशिवाय 10 हजारांचा दंडही सुनावण्यात आला आहे. या महिलेवर आपल्या 16 वर्षीय सावत्र भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
आरोपी महिला ही विवाहित आहे. मात्र सासरी पतीसोबत भांडण होत असल्याने ती माहेरी सावत्र भावाकडे परतली होती. येथे अनेक महिने ती 16 वर्षीय भाच्यासोबत शरीर संबंध ठेवत होती. यानंतर ती गर्भवती असल्याचं समोर आलं. आरोपी महिलेने मुलीला जन्मही दिला. या सर्व घटनेनंतर अल्पवयीन मुलाच्या आईने 5 जुलै, 2022 रोजी डेहराडूनमधील वसंत विहार पोलीस ठाण्यात पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा- लेकीच्या अपहरणानंतर बापाचा प्रताप उघड; सूड उगवण्यासाठी घरातील बांगलादेशी मुलीने रचला कट
आत्या भाच्याकडून गर्भवती
पतीसोबत वाद झाल्यानंतर ही महिला आपल्या सावत्र भावाच्या घरी राहत होती. येथे तिची अल्पवयीन भाच्यासोबत जवळीक निर्माण झाली. ती भाच्याला घेऊन पळून गेल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र ती परत आली तेव्हा ती 9 महिन्यांची गरोदर होती. या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर महिलेविरोधात कारवाई करण्यात आली. आता आरोपी महिलेने भाच्यापासून एका मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या डीएनए चाचणीतून हे मूल भाच्याचेच असल्याचं स्पष्ट झालं आहे.